अश्मयुगात माणसाचे सर्व जीवनच दगडांनी व्यापले होते. दगडाची उपयुक्तता व त्याची अफाट ताकद
माणसाच्या प्रत्ययाला आली. दगडाचा सर्वप्रथम उपयोग त्याला गवसला असणार तो म्हणजे शत्रूवर हल्ला
करण्यासाठी हत्यार म्हणून. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी झालेला हा उपयोग पाहून त्याला देवच मदतीला धावून
आल्यासारखे वाटले असणार. दगडांचे घर लाभल्यावर त्या काळात माणसाला झालेल्या आनंदाची आपल्याला
कल्पनाही करता येणार नाही. ऊन, वारा व पाऊस यांपासून ते वाघ-सिंहासारखी हिंस्र श्वापदे यांपर्यंत सर्वांपासून
दगडांनी माणसांचे रक्षण केले. तो पहिल्यांदा निवांत झोपला असणार ते दगडांच्या घरातच. हत्यारे व अवजारे
यांच्यामुळे माणसाचे जगणे अधिक सुलभ झाले. या वस्तू दगडांनीच दिल्या. दगडांचे असंख्य उपयोग तो अनुभवत
होता. जो दिसत नाही, तो देव दगडाच्या असंख्य रूपांत आपल्यासमोर अवतरला आहे आणि आपले रक्षण करीत
आहे, अशी त्याची भावना झाली असणार. त्यातूनच दगडातच देव असण्याची कल्पना स्थिरावली असणार.
Answers
Answered by
0
Please publish questions under proper subject
please try to understand
Similar questions