अशा परिस्थितित माझी शाळा सुरु झाली
Answers
Answer:
कोरोना आरोग्य संकटात समाजव्यवस्थेत मोठे बदल पहायला मिळत आहेत. खरंतर संपूर्ण जगातच जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले. दैनंदिन गोष्टीतही मोठे बदल पहायला मिळत आहेत. डिजिटल म्हणजेच ऑनलाईन शाळा हा त्यापैकीच एक.
शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारे लहान मुलं दिसतात. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेले दिसतात.
त्याचे फोटो सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही ही व्यवस्था नवीन आहे. पण याची खरंच गरज आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
डिजिटल शाळा भरते कशी?
डिजिटल शाळेचे अनेक प्रकार आहेत. मुख्यत: शाळेचं काम हे झूम या अॅपवरून चालतं. त्याच्या सोबतीला व्ह़ॉट्स अॅप, इमेल, विविध अॅप या सोयी आहेतच. केशव शिंदे सोलापूरमध्ये सुयश गुरुकुल नावाची संस्था चालवतात. पहिली ते बारावी असलेली ही शाळा सध्या डिजिटल स्वरुपात गेली आहे. सध्या या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग झूमवर सुरू असतात.
याबद्दल माहिती देताना त्यांनी म्हटलं, "या संकटाच्या काळात शाळा कशी चालवायची याची आम्ही फार तयारी केली नव्हती आम्ही झूम डाऊनलोड केलं. गुगल मीटिंग ट्राय केलं. एक महिना झाला आता. 22 मार्चपासून आम्ही ही शाळा सुरू केली. त्यात बारावी NEET, च्या विद्यार्थ्यांना शिकवलं. आमच्या शिक्षकांनाही फारशी माहिती नव्हती.
ही परिस्थिती किती काळ राहील याची कल्पना नाही त्यामुळे आम्ही आमच्या शिक्षकांना उत्तम ऑनलाईन शिक्षक होण्याचं आवाहन केलं. आम्ही बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. ज्याच्याकडे लॅपटॉप आहे त्यांच्यावरून स्क्रीन शेअर कशी करायची हे आम्ही शिकलो. तसंच गुगल बोर्डचा वापर शिकून घेतला. त्यामुळे नोट्स लिहायला मदत झाली. त्याचा फायदा झाला. ऑनलाईनची खरंतर गरजच नाही. फक्त नीटला बसणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. मुलांना स्क्रीन मोठी पाहिजे. मुलं बोलत नाही. व्हीडिओ ऑफ करतात. बोला म्हटलं तरी बोलत नाही. सारखं त्यांना आवाज येतो का हे विचारण्यात वेळ जातो. टीव्हीवरून ही सगळी व्यवस्था फार उत्तम होऊ शकते."
Answer:
____अशा परिस्थितित माझी शाळा सुरु झाली_____
शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांना विश्वासात घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली परिस्थिती पाहून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात ठाकरे सरकार याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतं.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात 'बिनभिंती'च्या डिजिटल शाळांचा पर्याय
मराठी शाळांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?
चंद्रपुरात 'मिशन मॅथेमॅटिक्स', बोलक्या भिंतीतून गणिताची गोडी
15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या नाहीत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शाळा सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पहावी लागणार का? दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय का?
शाळा सुरू करण्याला पालक आणि संस्थाचालकांची सहमती आहे का? शाळा सुरू होण्यास विलंब होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल का? अशा सर्व विषयांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.
शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन हा सध्या सगळ्यांचा चर्चेचा आवडता विषय आहे. परंतु करोनाकाळात शिक्षण कसं देणार या पेक्षा, ग्रामीण भागातील मुलांची सुरक्षितता जपणं, त्यांचं आणि पालकांचं मनोधैर्य टिकवणं, जेव्हा कधी शाळा सुरू होतील तेव्हा शिकणारी मुलं-मुली पुन्हा शाळेत येती करणं, हे शिक्षणक्षेत्रापुढचं फार मोठं आव्हान असणार आहे.
शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन हा सध्या सगळ्यांचा चर्चेचा आवडता विषय आहे. परंतु करोनाकाळात शिक्षण कसं देणार या पेक्षा, ग्रामीण भागातील मुलांची सुरक्षितता जपणं, त्यांचं आणि पालकांचं मनोधैर्य टिकवणं, जेव्हा कधी शाळा सुरू होतील तेव्हा शिकणारी मुलं-मुली पुन्हा शाळेत येती करणं, हे शिक्षणक्षेत्रापुढचं फार मोठं आव्हान असणार आहे.
…
एक अभूतपूर्व संकट सगळ्या जगावर कोसळलं आहे. ते दूर कुठेतरी होतं-आहे असं म्हणता म्हणता, ते आपल्या दारात-घरातच येऊन ठेपलं. जगभरातल्या सगळ्या आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था या संकटामुळे ढासळल्या आहेत; तसाच या संकटाचा फटका शिक्षणव्यवस्थेलाही बसला आहे. सुरुवातीचा काळ फार गोंधळाचा होता. या अशा परिस्थितीला आपण कोणीच सामोरे गेलेलो नव्हतो. अचानक आलेलं हे संकट प्रत्येक क्षेत्राला भांबावून टाकणारं होतं. त्याला तोंड कसं द्यायचं, हे सगळ्यांनाच नव्याने शिकायला लागणार होतं. साहजिकच शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नव्हतं.