अशररलेखन. अक्षर लेखन कसे करतात मला दाखवाना
Answers
नाही. माझ्या लक्षात माझी इयत्ता ५ वी पुढील वर्षे आहेत. इयत्ता ४ थी पर्यंत माझ्या वेळी पाटी अन पेन्सील असायची. म्हणजे वह्यावैगेरे होत्या असे आठवते, पण माझे अक्षर नक्की कसे होते अन लिहीतांना मी लेडपेन्सीलचा किती वापर करायचो ते नक्की आठवत नाही. नाही म्हणायला चित्रवैगेरे काढायचो. माझे १० वी पर्यंत शिक्षणाचे मराठी माध्यम होते. ५ वी नंतर शाळेचा कॅनव्हास मोठा झाला. माझे अक्षर तेव्हा फार वळणदार होते असे नाही. जाणूनबुजून, अक्षर सुधारणा होण्यासाठी पानेच्या पाने शुद्धलेखन कर असा काही प्रकार मी केला नाही. शाळेतल्या शिक्षकांनीही तसे प्रयत्न केले नाही. गृहपाठ त्यांनी तपासला पण कधी अक्षरावरून मार खाल्ला नाही. म्हणजेच माझे अक्षर इतरांनी वाचण्यायोग्य निश्चीतच होते.
त्यावेळी आत्ताच्यासारखे बॉलपेन, जेलपेन यांचे प्रस्थ नव्हते. जे काही मिळायचे ते शाई भरून वापरायचे फौंटनपेन मिळायचे. बॉलपेन वापरणे म्हणजे काहीतरी गैर करणे असे वातावरण होते. शिक्षकसुद्धा बॉलपेनने लिहीलेले असले की शिक्षा करायचे असे आठवते. शाईचा फौंटन पेन वापरला तर अक्षर सुधारते असा प्रवाद असायचा. त्या काळी Waterman व कॅम्लीन असले ब्रांडेड फौंटनपेन प्रसिद्ध होते. शाळेत काही वेळेस फिरते विक्रेते त्यांच्याकडचे शाईपेन विकायला यायचे. त्या पेनांवर बॉलपेनही मोफत असायचा. मी कधीच तसले पेन विकत घेतले नाहीत. त्याकाळी एकतर खिशात आता आपण देतो तसला पॉकेटमनी मुलांना द्यायची पद्धत नव्हती. माझ्या वडलांच्या ओळखीचे एक 'दिपक स्टोअर्स' म्हणून स्टेशनरीचे दुकान होते. तेथूनच आम्ही आमचे पेन, पेन्सीली, कागद आदी वस्तू घेत असू. फौंटनपेन विकत घेणे ही एक चैन असायची. फौंटनपेनची निब ही पुर्ण लांबीची असायची. बर्याचवेळा ही निब घासली जायची किंवा वाकडी व्हायची. मग २५-३० पैशात नविन निब टाकावी लागायची. निबच्याखाली असलेली जिभ ही कधी बदलावी लागायची नाही. त्या निब अन जिभ ची सेटींग करून (योग्य अंतर ठेवून) शाईचा फ्लो कमी जास्त करता यायचा. असल्या फौंटनपेनमध्ये शाई भरावी लागत असे. शाईची मोठी दौत घरी भरलेलीच असायची. ती कॅम्लीन कंपनीची होती असे आठवते. दुकानात शाई भरणे हाही प्रकार असायचा. अमुक दुकानातली शाई फिकी असते अशा गोष्टीही मित्रांमध्ये होत असत. शाई भरण्यास ५ पैसे लागत. एकदा दुकानदाराने आग्रह करून एक हाफ निबचा चायना पेन (त्याकाळीही असलेला!) घ्यायला आग्रह केला होता. त्यात शाई भरणे फार सोपे होते. पेन उघडला की त्याच्या आतमध्ये एक प्लास्टीकचे ड्रॉपर असे. ते दाबून पेन दौतीत बुडवला अन ड्रॉपर दाबणे सोडले की निबेद्वारे तो पेन शाई शोषून घेत असे. पण त्या हाफ निबच्या चायना पेनमध्ये शाई कमी बसत असे. माझा ५ वीत पहिला क्रमांक आला होता. वार्षिक स्नेहसंमेलनात मला शाळेने एक फौंटनपेन बक्षिस दिला होता. तो गळका निघाला.