अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती-ओहोटीच्या
वेळा सांगा.
Answers
Answer:
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा० पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०..८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात.समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते.उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणार्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात.निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणार्या समुद्राच्या पाण्यास हालचालीस भरतीस पूर असे म्हणतात.
Hope it helps you
Pls mark me brainliest