India Languages, asked by ai9580541, 20 days ago

Assay writing from 10std,
do not spam correct and
best answer will be mark
as brainlist.(Assay in Marathi)
urgent please!​

Attachments:

Answers

Answered by sneha14122008
1

Answer:

भारत हा माझा देश आहे. माझा देश खूप सुंदर आणि महान आहे. हा देश संपूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध देश आहे. माझा भारत देश हा सर्व देशांचा मुकुट आहे. लोकसंखेच्या दृष्टीने माझ्या भारत देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. माझा भारत देश विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो.

कारण या देशाची संस्कृती अन्य देशांच्या तुलनेने सगळ्यात वेगळी आहे. माझा भारत एक असा देश आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. माझा भारत देश सर्वात विशाल देश आहे.

माझ्या भारत देशाला अन्य नावानी ओळखले जाते. जसे कि इंडिया, इंदुस्तान, आर्यव्रत आणि सोने कि चिडिया इ. नावानी ओळखले जाते.

माझ्या भारत देशाला भारत हे नाव राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्या नावावरून पडले आहे.

माझ्या भारत देशाचा इतिहास हा संघर्षवादी आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर क्रांतीवीरानी आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.

त्यांना भारत देशासाठी अनेक संघर्ष करावा लागला, आपले प्राण गमवावे लागले. माझा भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी, १९५० साली भारताचे संविधान लागू झाले.

माझ्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माची भाषा आणि संस्कृती ही वेगवेगळी आहे.

माझ्या देशामध्ये हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, बौद्ध आणि अन्य धर्माचे लोक राहतात. हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.

माझ्या या भारत भूमीवर अनेक महान वीरांचा, नेत्यांचा

साधू– संतांचा, कलावंतांचा जन्म झाला आहे. माझ्या भारत देशाने शून्याचा शोध लावला म्हणून आज हे जग संख्या मोजत आहे. माझ्या या भारत देशाला थोर आणि पुण्यवान माणसे लाभली आहेत.

माझ्या भारत देशाचा तिरंगा व झेंडा या देशाची आन – बाण – शान आहे. या झेंड्याच्या सर्वात प्रथम केसरी, मध्यभागी सफेद त्यामध्ये सफेद पट्टीवर २४ चक्रांचे अशोक चक्र आणि शेवटी हिरवा रंग आहे.

माझ्या भारत देशाचे राष्ट्रीय फुल – कमळ, राष्ट्रीय फळ – आंबा, राष्ट्रीय पशु – वाघ, राष्ट्रीय पक्षी – मोर आहे. माझ्या भारत देशाची राष्ट्रीय भाषा – हिंदी आहे. तसेच रुपया हे भारताचे चलन आहे.

माझा भारत देश हा सणांचा देश आहे. या देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. जसे कि, होळी, दिवाळी, दसरा, महाशिवरात्री, रक्षाबंधन, मकर संक्रांति, गुढी पाडवा व अन्य सण साजरे केले जातात. विविध धर्माचे आणि जातीचे लोक भारतीय उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतात.

माह भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. हा देश गाव – गावांचा देश आहे. या देशातील बहुतेक लोक गावांमध्ये राहतात.

भारत देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय केला जातो. या देशात तांदूळ, गहू, ऊस यांची शेती केली जाते. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.

माझा भारत देश आज सर्व संकटांवर मात करून प्रगतीच्या दिशेने जात आहे. म्हणून मला माझा भारत देश खूप – खूप आवडतो. माझा देश मला सगळ्यात प्रिय आहे आणि मी माझ्या देशावर प्रेम करतो.

Similar questions