Art, asked by karanwaghdhare68, 1 year ago

अधिवेशन काळातील कोणता काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो​

Answers

Answered by TanishaFarjand
5

Answer:

अधिवेशन काळात दुपारी १२ वाजताचा काळ हा शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. हा काळ दुपारी १२ वाजता सुरु होत असल्यामुळे,याला शून्य प्रहर म्हटले जाते.शून्य प्रहर एकूण ३० मिनिटांसाठी असतो, या वेळात एखाद्या सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यासाठी तीन मिनिटे मिळतात. दुपारी १ वाजण्यापूर्वी हा प्रहर पूर्ण झाला पाहिजे.

शून्य प्रहर दरम्यान विषय मांडू इच्छिणाऱ्या सदस्यांना दैनंदिन सत्र सुरू होण्यापूर्वी संसद अध्यक्षांना सूचना देणे आवश्यक असते.शून्य प्रहर दरम्यान, दोन्ही सभागृहांमधील सदस्यांना तातडीने लक्ष देण्याची गरज असलेल्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी मांडण्याची संधी मिळते.

Similar questions