India Languages, asked by VeiniXo254, 1 year ago

atmakathan of blackboard in marathi

Answers

Answered by vidhidedhia9797
38
फळ्याचे आत्मवृत्त

“अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा”, दोन तासांच्या मधल्या वेळात आम्ही सगळे जण दंगा-मस्ती करत होतो तेंव्हा अचानक आवाज आला. “ऑ.. हे कोणं बोलले?” आम्ही इकडे तिकडे बघु लागलो. हे वाक्य तर समोरच्या फळ्यावर ‘आजचा सुविचार’ म्हणुन लिहीले होते. पुन्हा तोच आवाज आला आणि लक्षात आलं की दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क वर्गातील फळा बोलत आहे.

हो मुलांनो, मी फळाच बोलतो आहे, पुन्हा तोच आवाज आला. आज तुम्ही माझ्या अंगावर हा जो सुविचार लिहीला आहे तो खुप आवडला आणि विचार केला तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. तुमची दहावीची परीक्षा तोंडावर आली आहे. वर्षभर तुम्ही खच्चुन अभ्यास केला आहे आणि त्याचे फळ तुम्हा सर्वांना यश्याच्या रुपाने मिळेलच. पण म्हणतात ना ‘अपयश ही यश्याची पहीली पायरी आहे’ ते अगदी खरं आहे बरंका. तेंव्हा जर अपयश पदरी पडलं तरी त्याने खचून जाऊ नका, उलट अधीक जिद्दी व्हा, अधीक अभ्यास करा आणि मग यश हे तुमचेच आहे.
Answered by sarthakdeshmukh432
23

Answer:

Explanation:

अरेरे! काय माझी ही दुर्दशा! तुम्ही मला काळ्या रंगाने रंगवलं आहे. तुम्ही माझं तोंड काळं करून टाकलं आहे. विसरलात वाटते मला सारे जण? अरे मी तुमच्या वर्गात असलेला अविभाज्य घटक, म्हणजेच मी फळा आहे.''

तुम्ही मला आकाशात किंवा जमिनीवर नाही लावले. तुम्हीतर चक्क मला दोन खिळ्यांमध्ये त्रिशंकूसारखे अधांतरी टांगवले आहे. किती वषेर् झाली, मी इथेच आहे. कुठे जाता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही. दिवसा तुम्ही मुले शाळेत येतात व माझ्या मदतीने शिकता, तेव्हा किती आनंद होतो मला! परंतु रात्री मी या काळ्याकुट्ट खोलीत एकटाच असतो. रात्र जणू खायलाच येते मला! तेव्हा मी तुमची वाट पाहत असतो. कधी सकाळ होऊन तुम्ही शाळेत येता हे पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने तुमची वाट पाहतो. तुम्हापैकी किती जण वर्गात शिक्षक शिकवत असतात, तेव्हा मागे बडबड करीत असतात. शिक्षकाला मात्र हे सर्व पाहता येत नाही, पण मी हे सर्व पहात असतो... बरोबर ना दीपक?

कुणी माझ्या अंगावर गणित सोडवतात, कुणी संस्कृत संधी, समास लिहितात. शरीराचं सार्थक होत आहे, असं मला वाटतं. विज्ञानाचे शिक्षक माझ्यावर सुंदर आकृत्या काढतात. किती सुरेख असतात त्या! असे वाटते की कुणी कधी ते पुसूच नये. पण तुमचे इतिहासाचे शिक्षक आले की माझ्यावर जणू तोफांचा माराच होतो. ते जोरादर खडूचे फराटे माझ्या अंगावर उडवत असतात आणि तुम्हाला कारगिलची लढाई दाखवत असतात. त्यांनी माझ्या अंगावर नुसती भोकं पाडली आहेत.

माझा रंग काळा दिला आहे म्हणून मला खूप वाईट वाटते. पण मी असे ऐकले आहे की माझे काही बंधू आता गोरेदेखील आहेत. हे ऐकून बरे वाटते. कधी कधी माझ्यावर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे लिहिली जातात. तेव्हा वर्गात पहिल्या आलेल्याचे अभिनंदन करावेसे वाटते. पण काय करू! मला हात नाहीत ना! मी असे ऐकले आहे की, आपल्या वर्गात शिकून गेलेले काही विद्याथीर् परदेशी डॉक्टर आहेत. ते ऐकून खूप अभिमान वाटतो मला.

पण मला तुमचा रागही येतो. का तुम्ही मला काळं बनवलं? का तुम्ही मला असं अधांतरी लटकवलं? पण मी एक निश्चय केला आहे. मराठीच्या तासाला बेडेकर सरांनी तुम्हाला अनंत काणेकरांच्या 'दोन मेणबत्त्या' पाठ शिकवला होता. तो मला खूप आवडला. त्यात ती मेणबत्ती म्हणाली होती की, ' तू जर स्वत:साठी जगलात तर मेलास, पण दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास!' हे वाक्य मला खूप आवडते. म्हणून मीही दुसऱ्यांसाठी जगण्याचं ठरवलंय. दुसऱ्यांची सेवा करण्यातच मला धन्यता वाटते

Similar questions