Autobiography of a flower in marathi
Answers
Answer:
नमस्कर,मित्रांनो मी एक गुलाबाचे फूल बोलत आहे.आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे.
माझा जन्म एका बागेत झाला.मी माझ्या ५-६ भावा-बहिणींसोबत एकाच फांदीवर वाढलो.त्या बागेत माझ्याबरोबर माझे मित्र जसे चाफा,जुई,जाई,झेंडू,सूर्यफूल सुद्धा होते.बागेत फेरफटका मारायला आलेले वृद्ध, लहान मुलं आमच्याकडे आकर्षित व्हायची.मी माझ्या सुगंधाने वातावरणाला सुगंधित बनवायचो.
एके दिवशी एक लहान मुलगा माझ्या जवळ आला आणि त्याने मला उपटण्याचा प्रयत्न केला. पण माझा एक काटा त्याला टोचला व तो रडू लागला.त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या आजीने मला उपटले व त्याच्या हातात दिले. त्याने माझा वास घेण्यास सुरुवात केली, माझ्या पाकळ्यांशी खेळू लागला.काही वेळा नंतर त्याने मला जमिनीवर फेकले आणि तो निघून गेला. मी रात्रभर तसाच जमिनीवर पडून राहिलो. अनेक लोकं माझ्या अंगावरुन, मला चिरडून जात होती.दुसऱ्या दिवशी कचरा साफ करणाऱ्या कामगाराने मला उचलले आणि कचर्याच्या डब्ब्यात टाकले.
आता मी कचर्याच्या डब्ब्यात पडून हा विचार करतोय की माझे पुढचे राहण्याचे ठिकाण काय असेल!
Explanation: