autobiography of a mobile in marathi
answer for 50 points
NO SPAMS
Answers
Answer:
आज मोबाईल चाळीस वर्षांचा झालाय. मानवाच्या विकासात तंत्रज्ञानाने मोलाची भूमिका बजावली आहे..माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे...मोबाईल फोन ही त्यापैकीच एक आहे...संवादाचं महत्वाचं साधन बनलं आहे..
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय...मोबाईल फोन हे त्यापैकीच एक...आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे....मोबाईलमुळं जग जवळ आलं आहे. पण मानव संस्कृतीच्या इतिहासात डोकावल्यास माणसाने संवादासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केल्याच लक्षात येईल.
मानव संस्कृतीच्या उदयाला ५० हजार वर्ष उलटून गेली आहेत... सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला...कालांतराने भाषा अस्तित्वात आली...संवादासाठी भाषेचा वापर सुरु झाला...मानवाने माध्यम म्हणून प्राणी आणि पक्षांचा वापर केला.पुढं दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली..
पहिल्या विश्वयुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला. तर दुस-या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला...त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता..१९४०च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली...
पुढची तीन दशकं यावर बरचं संशोधन झालं..आणि ग्राफिक्स इन -३ एप्रिल १९७३ ग्राफिक्स आऊट- ला पहिला मोबाईल फोन कॉल झाला.. मोटोरोला कंपनीचे इंजीनिअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता...तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता...
आज त्या घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झालीत...सुरुवातील केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल फोन आज स्मार्ट फोन बनला असून इंटरनेटपासून ते फोटपर्यंत आणि व्हिडिओ कॉलिंग पासून ते मनोरंजनापर्यंत सगळं काही एकट्या मोबाईलमध्ये सामावलं आहे...त्यामुळेच मोबाईल फोन माणसाचा जीवलग बनला आहे..
मोबाईल फोन आज प्रत्येकाची गरज बनला आहे...कारण मोबाईलमुळे कोणत्याही व्यक्तीशी...कधीही आणि कुठेही तुम्ही सहज संपर्क करु शकता....त्यामुळे संवादाचं हे साधन जगभर लोकप्रिय ठरलं आहे...गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन पहायला मिळतो...सुरुवातीच्या काळात केवळ संवादाचं माध्यम म्हणून मोबाईल फोनचा वापर केला गेला...
बदलत्या काळाबरोबर मोबाईल फोनही बदलला आणि आता तो स्मार्ट बनला आहे...संवाद साधण्याबरोबच इंटरनेट, फोटो,जीपीआरएस,व्हीडिओ कॉलिंग,मनोरंजन असं सगळं काही मोबाईल फोनमध्ये सामावलं आहे.
स्मार्ट फोनमध्ये आज अनेक एप्लिकेशन्स उपलब्ध असून कॉम्प्यूटरपेक्षाही जास्त एप्लिकेशन्स हे स्मार्ट फोनसाठी तयार केले जात आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य,कला,तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रासाठी मोबाईल फोनला महत्वाची भूमिका बजावणार आहे. मोबाईल फोनमुळे आवघं जग मुठीत आलं असून भविष्यात मानवाच्या विकासात त्याचं महत्व आणखी वाढणार आहे..
Answer:
भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात.
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे/काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अॅपल, सीमेन्स, सॅमसंग
रेड मी,विवो या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.
दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे.
मोबाईल फोनचे काही वाईट परिणामही दिसून येतात. दिवसरात्र फोनला चिकटलेले लोक कुटुंबीयांपासून दुरावतात. त्या मुळे त्यांच्या जीवाला ही धोका असतो.लहान मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.ताण-तणाव वाढतो,दृष्टीवर परिणाम होतो,झोप व्यवस्थित लागत नाही,नैराश्य येते,विचार करण्याची क्षमता कमी होते ई.परिणाम भ्रमणध्वनीच्या अति वापराने होतात.
Explanation: