autobiography of clock in marathi
Answers
नमस्कार मित्रा,
जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त -
सकाळी गजर वाजला उठून बघितलं, घड्याळात ७ वाजले होते. तो गजर बंद करून परत झोपलो. अचानक आवाज आला, 'अरे उठ किती झोपतोस!' मी घाबरलो. घरात कुणीच नसताना कोण बोललं.
'अरे मी बोलतोय मी, तुझे घड्याळ. आज तुझ्याशी बोलावसं वाटलं. तुझ्या वडिलांनी मला एका इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात खरेदी केलेले. तेंव्हापासून आजपर्यंत तुमच्या घराची सेवाच करत आलेलो आहे. ९ वर्ष उलटली तुझ्या वडिलांचं निधन झालं आईला तू घरातून हाकलून दिल. या सर्व गोष्टीला मी अभागीपणे साक्ष देत होतो. त्या ममतेने अश्रू अजून माझ्या डोळ्यात भरून आहे.'
'तू माझा नियमित वापर करतो. येताजाताना वेळ बघण्यासाठी उपयोग करतो. ऑफिसला जाण्यासाठी अलार्म सेट करतो. तुझ्या आनंदातच माझा आनंद. परंतु आता मी जुना झालोय. कधी बॅटरी संपते तर कधी माझे तीन काटे एकमेकांत अडकतात. परंतु एका चांगल्या गुरुसारखा तू माझा त्याग केला नाहीस अजून.'
'परंतु एक दिवस असा येईल जेव्हा मला बदलणं तुझी गरज होईल. तो क्षण दोघांसाठीही दुखदायी असेल. चल जा तू ऑफिसला मीही माझं काम करतो. बाय बाय...'
धन्यवाद...