autobiography of river in marathi
Answers
Answer:
I HOPE IT'S HELP YOU......
Answer:
here is your answer
Explanation:
जेव्हा आम्ही घरातील सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो. तेव्हा ताजमहाल, ऋषिकेश अशा पर्यटन स्थळी फिरून आम्ही गंगोत्री म्हणजे गंगा नदीच्या पत्रावर गेलो. तिच्या काठावर मी भटकत होते आणि माझे मन स्थिर होत नव्हते.
माझ्या मनाला धकधक लागून राहिली होती. मी तिथे एकटी फिरत असताना माझ्या कानी हाक ऐकू आली. मी इकडे – तिकडे पाहिले. पण मला तिथे कोणीच दिसेना. मला वाटल भास झाला म्हणून मी पुढे सरसावले. परंतु आणखी एकदा मला हाक ऐकू आली.
तेव्हा नदी म्हणाली, आग घाबरतेस कशाला ? मला ओळखले नाहीस का तू ? तू किती वेळा माझ्या पाण्यामध्ये खेळून आनंद लुटलास तीच मी या आपल्या मातृभूमीची माता, गंगा नदी. माझी ओळख विसरलीस का तू. मी तुला आज माझी कहाणी सांगते. मग तू विचार कर आणि तुझा मूल्यवान वेळ माझ्या सोबत व्यतीत कर. माझे सुख – दुख समजून घे.
जन्म
मी एक नदी आहे आणि माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर आणि पर्वतमालांच्या कुशीत झाला आहे. मी लहानपणापासूनच फार अवखळ होते. तसेच मी एका जागेवर न थांबता सतत वाहत असते.
मी जेव्हा वाहत असते तेव्हा माझ्या समोर अनेक संकट येतात. तरीपण मी आपल्या जीवनामध्ये रस्ता काढून सतत धावत राहते. वाटेतील झाडे – झुडपे, तसेच वेली माझा वात अडविण्याचा प्रयत्न करतात. तर कधी – कधी माझ्याशी लपंडाव सुद्धा खेळतात.
धैर्याला सामने
मला नेहमी अनेक भाऊ – बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे मी जास्त वेगाने वाढत असे. जसे मी कळसापासून पायथ्यापर्यंत वाहत जाते असे तेव्हा मला अन्य संकटाना सामोरे जावे लागत असे. मी सर्व संकटाना तोंड देऊन आपले ध्येय गाठत असते.
मी एखाद्या शूरवीर योद्ध्या प्रमाणे लढत असते आणि माझ्या जीवनात पुढे जात असते. या सगळ्या संकटांमध्ये माझ्या बहिण – भावंडानी माझी शेवट पर्यंत साथ दिली.
अनेकांना जीवन दान
मी मैलोनमैल धावत जाऊन सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले. त्याच बरोबर सर्व पशु – पक्ष्यांची तहान भागवत राहिले. माझ्या पाण्यामुळे सर्व शेते हिरवीगार दिसू लागली.
तसेच कित्येक लोकांनी माझ्या पाण्यावर शेती करून आपले आजीविका भागवली. त्याच बरोबर शहरे पण अन्नधान्य संपन्न झाली.
कारखान्यातील सांडपाणी
बहुतेक लोक सुद्धा माझ्या पाण्याचा अति वापर कारखान्यात करू लागले. तसेच कारखान्यातील सांडपाणी माझ्या नदी पात्रात सोडू लागले. त्यामुळे मला खूप काही भोगावे लागले. आज मी अनेक लोकांमुळे प्रदूषित झाले.
भगवान शंकरांच्या माथ्यावर स्थान मिळवलेली आज मी दुषित झाले आहे. माझ्या या जल पात्रात अनेक जीव – जंतू, जलचर प्राणी – वनस्पती मरण पावू लागले आहेत. परंतु माणसाला याची काहीच चिंता नाही.
निष्कर्ष:
मी तुम्हा सर्वाना सगळ्यात शेवटी अशी विनंती करते कि, मला प्रदूषित करू नका. कारण माझ्या नदीचे पाणी हे तुमच्याच उपयोगासाठी येते. तसेच माझे पाणी हे हिंदू धर्मात पूजेमध्ये वापरले जाते.
hope this helps you
make me as brainlister