Autobiography of Umbrella in Marathi Essay, Chatri ki Atmakatha Nibandh
Answers
जून महिन्यात पाऊस पडायला लागला की लोकांना माझी आठवण येते. गेल्या एक वर्षापासून कपाटात मी काळोखात असते. अहो आता तरी ओळखला का मला ?
मी छत्री बोलतेय!!
पाऊस संपल्यानंतर मला तुम्ही लोकं कपाटात बंद करून ठेवता. मला खूप वाईट वाटते कारण पुडचे एक वर्ष मी बंद अवस्थेत पडून असते. मला खूप भीती वाटते. निदान माझा वापर उन्हाळ्यात तरी करा, अस बंद ठेवून देवू नका. पण जेव्हा पावसाचा आवाज माझ्या कानावर पडतो तेव्हा मला खूप आतुरता असते की कधी मला तुम्ही लोकं बाहेर काढणार व पावसाचे पाणी माझ्यावर पडणार!
अशी मी छत्री छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत असते! कधी कधी कपाटात खूप दिवस पडून राहिल्याने माझ्या अंगाला भोक पडतात, मग मी तुम्हाला पावसाळ्यात सुक नाही ठेवू शकत. पण जेव्हा मला तुम्ही माझ्या डॉक्टर (म्हणजेच छत्री दुरुस्त) करणाऱ्या व्यक्ती कडे नेहेता तेव्हा मला खूप आनंद होतो, माझे दुखणे सगळे निघून जाते. आता मी थोडी जुनी झाली आहे, मार्केटमध्ये माझ्यापेक्षा सुंदर, टिकाऊ, सुबक छत्र्या आल्या आहेत. आता माझा मालक मला फेकून देईल की काय हा विचार माझ्या डोक्यात येत असतो त्याची मला खूप भीती वाटते पण असो जुन्या गोष्टी गेल्याशिवाय नवीन गोष्टी येत नाहीत
Answer:
chataricha aatamkhata