अविचाराने ओढवला भीषण अपघात सेल्फी काढताना जीव गमावला मुंबईतील महिला पर्यटकाचा माथरान येथे दरीत पडून मृत्यू बातमीलेखन
Answers
Answer:
I hope that will be help you
Answer:
अविचाराने ओढवला भीषण अपघात
20 जानेवारी, मुंबई: कांदिवली उपनगरातील सविता पाटील या पंचवीस वर्षाच्या महिला आपल्या कुटुंबासोबत माथेरान येथे सहलीसाठी गेल्या होत्या. कुटुंबासोबत मौजमस्ती करत असताना सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा भीषण अपघात झाला.
निसर्गरम्य दृश्य आपल्या कॅमेरा मध्ये कैद करण्यासाठी माथेरान येथील दरी च्या किनारी उभे राहून विलक्षण असा प्रसंग टिपण्याचा सविता ह्या प्रयत्न करत होत्या. सेल्फी काढण्याच्या नादात आपण दरीच्या एकदम किनाऱ्यावर आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही व त्यांचा पाय घसरून त्या दरीत पडल्या.
कुटुंबाच्या इतर व्यक्तींना लक्षात आल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून धावपळ करून सविता जवळ पोहोचले. जवळच्या दवाखान्यामध्ये नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी लगेच त्यांना मृत घोषित केले.
प्रत्यक्ष उपस्थित व्यक्तीने सांगितले की त्यांना सूचना देऊन देखील सेल्फी काढण्यासाठी ते दरीकडे जात होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.