avadta TAAS essay in Marathi
Answers
Answer:
Bro what is the meaning of avadta TAAS
■■ माझा आवडता तास■■
शाळेच्या आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनात आयुष्यभरासाठी कायम राहतात. आपण या आठवणी कधी विसरू शकत नाही.
शाळेती मित्र मैत्रिणींसोबत केलेली मजा, वेगवेगळ्या तासांमध्ये शिक्षकांकडून मिळालेल्या ओरडा या सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवण असतात.
शाळेत प्रत्येकाचा एखादा आवडता विषय असतो. त्या आवडत्या विषयानुसार, त्याला शाळेमध्ये त्या विषयाचा तास सुद्धा आवडतो.
कोणाला गणिताचा तास आवडतो, तर कोणाला मराठीचा ,तर कोणाला विज्ञानाचा.याच प्रकारे, माझा आवडता तास होता इतिहासाचा.
इतिहासाच्या तासात मला खूप मजा यायची.आमच्या इतिहासाच्या शिक्षिका खूप चांगल्या प्रकारे इतिहास शिकवायच्या. त्या कधीकधी आम्हाला काही मनोरंजक कथा सुद्धा सांगायच्या.
इतिहासाचे धडे त्या अगदी सोप्या प्रकारे आणि एका कथेच्या रूपात सांगायच्या, ज्यामुळे आम्हाला तो विषय चांगल्या प्रकारे समझायचा.मी शाळेत गेल्यावर नेहमी इतिहासाच्या तासाची वाट पाहायची.