अवर्षण आणि पुरांच्या वारंवारितेत वाढ होत आहे.
Answers
Answer:
जागतिक हवामान बदल, बाबी व परीणाम, कारणे, अभ्यास साधने
हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा समावेश असतो.
हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ- गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा. 2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.
2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते. त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.
3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.
4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.
हवामान बदलाची नैसर्गिक कारणे-
1 सौरउर्जा- सुर्यापासून मिळणारी उर्जा ही सर्वत्र व सर्वकाळ सारखी नसते. सौरउर्जा ही तापमानावर परीणाम करीत असते त्यामुळे त्याचा परीणाम प्रत्यक्ष हवामानावरही होत असतो.
2 पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर (मिलन्कोव्हीच थेरी)- यानुसार सुर्याचे पृथ्वीपासून चे अंतर कमी होते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात वाढ होणे तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर वाढणे तेव्हा पृथ्वीचे तापमान कमी होते. जेव्हा पृथ्वी सुर्यापासून दूर जाते तेव्हा पृथ्वीवर हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते.
3 ज्वालामुखीय उद्रेक- ज्वालामुखीच्या उद्रेकातुन वातावरणात अनेक वायु बाहेर पडत असतात त्यात सल्फर डायऑक्साईड ही असतो. हे वायु बऱाच काळापर्यंन्त वातावरणात टिकुन राहतात त्यामुळे बऱ्याच वेळा हे वायु वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लांबपर्यन्त पसरतात. बऱ्याच वेळा या वायुमुळे पृथ्वीवर सौरताप कमी पोहचतो. मागील दोन शतकात तसेच सन 1982 (एल सिऑन) व सन 1991 (पिंटाबू) मध्ये झालेल्या मोठया ज्वालामुखी उद्रेकांमुळे सार्वात कमी तापमानांच्या वर्षांच्या नोंदी झालेल्या आहेत. तसेच काही वर्षांसाठी काही प्रमाणात तापमान घटल्याच्याही नोंदी आहेत.
Answer:
अवर्षण आणि पुरांच्या वारंवारितेत वाढ होत आहे.