Geography, asked by adityaboos83, 28 days ago

. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(अ) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.
(आ) ज्या ठिकाणी एखादया वस्तूचे उत्पादन अतिरिक्त
होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते.
(इ) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय
व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.
(ई) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच
सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी
सार्क ही संघटना कार्य करते.​

Answers

Answered by ItzMissAatma
14

★ उत्तर - (अ) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.

हे विधान अयोग्य आहे.

कारण - भारत हा देश स्वयंपूर्ण नाही कारण भारताला काही बाबींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते.

(आ) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते.

हे विधान योग्य आहे.

ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथुन त्या वस्तूंचा पुरवठा होतो.

(इ) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.

हे विधान अयोग्य आहे.

कारण - स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

(ई) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.

हे विधान अयोग्य आहे.

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते.

धन्यवाद....

Similar questions