बाबा विषयी आदर व्यक्त करणारे शुभेच्छा पत्र तयार करा.
Answers
Answer:
काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं बाबांचं व्यक्तिमत्व नाही आणि म्हणूनच आज पर्यंत बाबांवर एकही कविता नाही...
माझे बाबा... जन्म झाल्या झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हाता घेतलं ते माझे बाबा...
माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि पुन्हा सकाळी गुड मॉर्निंग
म्हणत पुन्हा ड्युटीवर जायला तयार असणारा माझा बाबा....
आई प्रेमानी घास भरवत असताना मला अंगाखांद्यावर खेळवणारे माझे बाबा...
आई अभ्यास घेत असताना मी ऐकला नाही तर रागवणारे माझे कठोर बाबा .... आणि नंतर 'मी जरा जास्तच रागावलो का?' असं आईला हळूच विचारणारे माझे प्रेमळ बाबा....
जगाच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळच्या वेळेवर काम नाही झाले तर चिडणारे शिस्तप्रिय बाबा.....
परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे, स्पर्धेमध्ये नंबर आल्यावर पेपरमध्ये नाव आणि फोटो आला असेल तर कात्रण कापून व्यवस्थित फाईलला लावणारे, बाहेरून येताना माझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणारे, माझं कौतुक करणारे माझे बाबा...
आपल्या मुलांसाठी आवर्जून वेळ काढणारे माझे बाबा...
गर्दित वाट काढत काढत माझे जास्तीत जास्त फोटो काढणारे माझे बाबा... माझा नाही आला तर समूजन सांगणारे बाबा.... नोकरीत व्यस्त असताना, आई कोणत्याही कर्तव्यात कधीही कमी पडणार नाही हे माहिती असून आजी आजोबांच्या गोळ्या औषधांची फोनवर चौकशी करणारे माझे कतव्यदक्ष बाबा...
दिवसा कमीत कमी 2 वेळा आमच्याशी फोनवर बोलणारे माझे बाबा.... बाहेरगावी असताना रात्री आमचे फोटो पाहत झोपणारे आम्हाला मिस करणारे माझे बाबा...