Geography, asked by chhayapokharkar4949, 5 months ago

बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता जास्त आढळते​

Answers

Answered by sahanakr8
5

Answer:

तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे श्रीलंका व भारताची पूर्व किनारपट्टी, उत्तरेला बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमारची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी.२ आहे

Explanation:

पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र हे भारतीय महासागराचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण या दोन्ही सागरात काही मूलभूत फरक आहेत व त्यामुळे या महासागरात होणाऱ्या नैसर्गिक घडामोडी एकमेकांपेक्षा फारच भिन्न असतात. काही आठवड्यांपूर्वी ‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशात उच्छाद मांडला होता. त्यावेळी उत्सुकतेपोटी असा प्रश्न उपस्थित झाला होता की, अरबी समुद्रात अशा प्रकारची वादळ निर्माण होत नाहीत, किंवा फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. हे असे का घडते?

चक्रीवादळ कसे निर्माण होते?

जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणाऱ्या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. अशा वादळांचा वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. पण जेव्हा हे वादळ जमिनीला  टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते. बंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळ एकापाठोपाठ एक निर्माण होत असतात.

चक्रीवादळ निर्मितीची एक जटील प्रक्रिया आहे. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असाव्या लागतात. एकतर समुद्रात योग्य हवा, त्याची दिशा आणि तापमान असणे आवश्यक असते. समुद्राच्या पृष्ठ पाण्याचे तापमान तसेच वातावरणातील ‘ट्रोपोस्फेर’चे (७ ते १२ किमीचा पट्टा) तापमान चक्रीवादळ निर्मितीत खूप मोठे योगदान देत असतात. पण हवेची गती जर जास्त असेल व तिच्यातील ऊर्जा कमी, किंवा अधिक  झाली तरीसुद्धा वादळ निर्माण होण्याची शक्यता कमी होत जाते. समजा एखादे चक्रीवादळ निर्माण होण्याच्या तयारीत आहे, पण हवेची गती जास्त आहे, तर हे वादळ पूर्णत्वास येण्याआधीच हवा त्याला दुसरीकडे उडवून नेते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त व बाष्पीभवन कमी होत असते. त्याचबरोबर हवेची गती सुद्धा जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण नसते.

बंगाल खाडीतील पृष्ठ पाण्याचे तापमान सामान्यपणे २८ डिग्री सेल्सिअस इतके असते. आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ‘ट्रोपोस्फेर’ दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते, व तिथे जर योग्य तापमान असेल, जेणेकरून या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावत असेल तर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. चक्राकार फिरणारे वारे जेव्हा जमिनीच्या दिशेने जातात तेव्हा कमी होत जाणाऱ्या ऊर्जेने या वाफेचे बाष्पीभवन होऊन ती पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळते. जमिनीला जेव्हा चक्रीवादळ स्पर्श करते तेव्हा समुद्रापासून गरम झालेल्या पाण्याची ऊर्जा त्याला मिळत नाही व हे वादळ आपोआप शांत होते.

दक्षिण-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असे म्हटले जाते. या वाऱ्यांचाही वादळनिर्मितीत फार मोठा सहभाग असतो. हे वारे पार दुरून पश्चिम भारतीय महासागरातील विषुववृत्तापासून वाहतात व अरबी समुद्रावरून संचार करत सह्याद्रीला पार करतात व नंतर उपखंडाच्या जमिनीवरून उडत जातात. या साऱ्या प्रवासात हे वारे आपल्याबरोबर समुद्रातील आर्द्रता घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरूपात शिंपडते. बंगाल खाडीतील वादळ या हवेची दिशा बदलू शकतात व मान्सूनला रोखू शकतात. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबले आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा मौसम कधी सुरू होतो?

अरबी समुद्रात चक्रीवादळ सामान्यपणे मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबरला निर्माण होतात. या समुद्राचे तापमान बंगालच्या खाडीतील पृष्ठीय तापमानापेक्षा एकदोन डिग्रीने कमी असते. या समुद्रात हिमालयातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहते. बंगालच्या खाडीत सुद्धा हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी व खालच्या थरातील थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंग होण्याचा प्रयत्नात असते. त्यामुळे अरबी समुद्राचे पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एकदोन डिग्रीने कमी असते. बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्याशा प्रभावीपणे होत नसते. २८ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याकारणाने अरबी समुद्रावरील वातावरणातील ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळ निर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे.

Similar questions