Hindi, asked by naresh356, 11 months ago

बागेतील एक संध्याकाळ निबंध

Answers

Answered by halamadrid
63

◆◆बागेतील एक संध्याकाळ◆◆

गावी आमच्या घराजवळच एक बाग आहे.एके संध्याकाळी,मी तिथे असच फिरायला गेले होते.

बागेचे दृश्य खूप मोहक होते.तिथे विविध प्रकारची झाडे होती.मोठमोठी नारळाची झाडे,आंबा,फणसाचे झाडे मी तिथे पाहिले.

चिकूची व केळीची झाडे सुद्धा मला पाहायला मिळाली.गुलाब,मोगरा,जासवंद फुलांची झाडे पाहून माझे मन अगदी प्रफुल्लित झाले.

बागेच्या बाजूलाच एक प्लेग्राउंड होते.तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे पाळणे होते.जसजशी संध्याकाळ होत गेली, तसतसे लहान मुलांची गर्दी तिथे वाढत होती.

मी बागेत एका ठिकाणी बसून सगळे दृश्य पाहत होते.मला तिथे खूप आनंद मिळत होता.माझे मन अगदी प्रसन्न झाले होते.

Similar questions