Hindi, asked by patilswati621990, 9 months ago

बागेतील फुले आणि तुमच्यातील संवाद लिहा​

Answers

Answered by prathmesharu7
0

Answer:

हे उत्तर आवडल्यास like करा

Explanation:

परिजातचे हे वर्णन त्याच्या गुणांना साजेसे आहे. पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळण-या पांढ-याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा प्राजक्त म्हणुनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतुर कडांची पानेही खरखरीत असतात. या पानांचा उपयोग प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी केला जात असे. याची फुलं म्हणजे सौंदर्य आणि सुगंध याचा उत्तम मिलाफ आहे. ही फुलं पांढ-या पाकळ्याची आणि देठ केशरी रंगाचे असतात. अत्यंत नाजुक असे हे फुल हातात घेतली तर लगेच सुकते. ही फुल खरे तर हाताळायची नसतातच, हलकेच टिपून घेउन परडीत ठेवायची असतात.

या फुलाच्या देठांपान सोनकेशरी रंग तयार करता येतो. त्याचा वापर रेशीम, कापड, लोकर इ. रंगवण्यासाठी तसेच खाद्यरंग म्हणूनही करता येतो. चातुर्मासात लक्ष फुले वाहण्याचा संकल्प करणा-या भाविकांना ही फुले प्रिय वाटतात. कारण पावसाळ्यात भरभरून फुलणारी असल्याने ही फुले सहज उपलब्ध होतात. रात्री या फुलांचा सडा वृक्षाच्या भोवती पडलेला असतो आणि त्याचा सुगंधही दरवळतो त्यामुळे प्रसन्न वाटते असा गुण यात आहे.

पारिजातकाची कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, देखण्या सूर्यावर मोहित झालेल्या एका सुंदर, स्वप्नाळू राजकन्येवरून सुर्याचे मन उडतं आणि तिला अव्हेरून तो दुस-या मुलीकडे निघून जातो. या अपमानाने निराश झालेली राजकन्या देहत्याग करते. तिच्या चितेच्या राखेतून रोपट्याच्या रूपने ती पुन्हा जन्म घेते, आणि तिचे वृक्षात रुपांतर होते. मात्र तिचा सूर्यावरचा राग गेलेला नाही त्यामुळे ती रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्या अश्रूंचा पुषरूप सडा जमिनीवर शिंपते.

‘आज अचानक असे जाहले

सांजही भासे मला सकाळ

प्राजक्ताच्या आसवंत सखि

सवें मौक्तिकें आणि प्रवाळ !’

कवी बा.भ.बोरकरांनी ह्या फुलांचे समर्पक वर्णन केले आहे.

बकुळ

Bakuliवहीचे पान अलगद उलगडतांना बकुळीची फुले हाती लागतात आणि “शब्द, शब्द जपून ठेव, हे बकुळीच्या फुलांपरी” या गाण्याच्या ओळी सहज आठवतात. आपल्या परिसरात आढळ्णा-या फुलांच्या झाडांमध्ये बकुळ हे वैशिष्टयपूर्ण दुर्मिळ झाड आहे. या फुलाचा रंग फिकट तपकिरी असतो. हे झाड मध्यम उंचीचे असते. खोड काळपट चॉकलेटी रंगाचे असते. पाने हिरव्या रंगाची असतात. पानांच्या कडेने नक्षी असते. या झाडाची फुले नाजुक असतात आणि पाकळ्या बारीक असतात. फुलांना मंद सुगंध असतो. ही फुले गजरा करण्यासाठी वापरतात. तसेच देवाला वाहतात. या झाडाला बिया येतात. त्या बियांची लागवड करून रोपे तयार केली जातात. या झाडाचे खोड जाड असते. चाफ्याच्या झाडाप्रमाणे हे झाड उंच वाढते, परंतु पाने मध्यम आकाराची असतात. सर्वसाधारण्पणे ही फुले थंडीच्या दिवसात म्हणजे आक्टोबर ते जानेवारी या कालावधीत बहरतात. सकाळी ही फुले ताजी असतात आणि दुपार झाली की कोमेजतात. पहाटे या झाडाच्या छायेत छान सुगंध येतो. थंडीच्या दिवसात या झाडाखाली फिकट तपकिरी फुलांचा सडा पडतो. लांबवर पसरणा-या या फुलाच्या सुवासाने माणसे आपोआपच या फुलाच्या झाडाकडे आकर्षिली जातात. ही फुले बागेत आढळतात. रोजच्या व्यवहारात ही फुले वापरली जात नाहीत. दुर्मिळ असल्याने ही फुले बाजारात क्वचित पहावयास मिळतात.

हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. ह्याच्या फळाचे मुरंबे किंवा लोणचे घालतात. बियांत स्थिर तेल असून ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते. याचे लाकूड गर्द पिंगट, कठीण, टिकाऊ व जड असून रंधून व घासून ते गुळगुळीत व चकचकीत होते त्यामुळे याचा बांधकाम व सजावटी सामान, घाणे, होड्या, वल्ही, हत्यारांचे दांडे, कपाटे, वाद्ये, मसळे, कातीव काम, हातातल्या काठ्या यासाठी उपयोग होतो. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात. ही फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो. हे साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त आहे. साल स्तंभक, शक्तीवर्धक व ज्वरघ्न असते. याची साल पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात चूळा भरण्यास चांगले असते. या झाडाचे फळ स्तंभक असून ते जुनाट आंमाशावर व अतिसारावर गुणकारी असते. या झाडापासून डिंकही मिळतो. कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यात वापरतात. सुक्या फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी व वेदना कमी होतात. महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता, कौटिलीय अर्थशास्त्र आणि संस्कृत साहित्यात मेघदूत, रघुवंश, मालतीमाधव आणि गीतगोविंद यांत बकुळाचा उल्लेख आढळतो; हा वृक्ष पूज्य व घराजवळ लावण्यास योग्य मानला आहे.

या झाडाला इंग्रजी भाषेत स्पॅनिश चेरी, उर्दू भाषेत किराकुली, कानडी भाषेत रंजल ,कोंकणी भाषेत ओमवाल, गुजराथी भाषेत बरसोळी, तामीळ भाषेत मगिळ्हांबू, बंगाली भाषेत बकुल, मणिपुरी भाषेत बोकूल लै, मराठी भाषेत बकुळी, मल्याळम भाषेत इळन्नी, हिंदी मध्ये मौलसरी आदी नावे आहेत.

Similar questions