बाकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
Answers
हॅलो फ्रेंड्स, अहो माझे बालमित्र! ओळखला नाही का मला अजुन? तुमच्या शालेय जीवनातला मी एक भाग होय. तुम्ही ज्यावर बसता, अभ्यास करता, डबा खाता तोच मी शाळेतला बाक होय!
माझा जन्म एका लाकडी बाक कारखान्यात झाला. मला व माझ्या मित्रांना तुमच्या शाळेत आण्यात आलं. नवीन जागा, नवीन शाळा बघून आम्ही खूप उत्सुक झाले होतो. जेव्हा तुम्ही लहान मुलं आमच्या अंगावर बसलात तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. हुशार मुले ते खोडकर , अभ्यास न करणारी मुले, मी सगळं काही बघितले आहे. पण जेव्हा काही मुले आमच्यावर चित्र विचित्र रेशा, रेगोटे मारायचे तेव्हा आम्हाला खूप दुखापत होत. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो, कारण काही इलाजच नव्हता. चला आता मुलं शाळेत यायची वेळ झाली, माझी पूर्ण कहाणी नंतर सांगतो.
■■बाकाचे आत्मवृत्त■■
नमस्कार,मित्रांनो मी तुमचा मित्र 'बाक' बोलत आहे. आता मी खूप खराब झालो आहे,म्हणून मी खूप वाईट दिसतो. पूर्वी मी असा नव्हतो.
माझा जन्म एका कारखान्यात झाला होता. तिथे माझ्यासारखे माझे अनेक मित्र होते. आम्ही लाकड़ापासून बनवले गेलो होतो व आमच्यावर छान भड़क तपकिरी रंग लावले गेले होते.
नंतर मला माझ्या इतर मित्रांसोबत एका शाळेत पाठवण्यात आले होते. त्यादिवशी मी खूप खुश होतो. शाळेत पाचवीच्या वर्गात पुढच्या जागेवर मला स्थान मिळाले होते. मुले माझ्यावर बसण्यासाठी भांडण करत होती. मी तिथे खूप खुश होतो.
मी सगळ्या मुलांची खूप मदत केली. माझ्यामुळे त्यांना आरामात अभ्यास करता आले. पण काही वर्षांनी,ती मुले माझ्याशी अगदी वाईट वागू लागली.
त्यांनी माझ्यावर शाईचे डाग पाडले, काहीबाही लिहून ठेवले. माझ्यावर कशाबशा उड्या मारायचे. एक दिवशी मुलांमध्ये भांडण झाले,ती माझ्यावर चढून एकमेकांना मारू लागली.त्यामुळे, मी तुटलो.
माझ्या अशा अवस्थेमुळे मला स्टोर रूम मध्ये ठेवण्यात आले. देव जाणे आता माझ्या भविष्यात काय लिहिले आहे!