Sociology, asked by archanagute14, 8 hours ago

बँकेचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा​

Answers

Answered by ghanshyamkoche786
1

Answer:

बँकांचे प्रकार

कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये बँका महत्वपूर्ण भूमिका बजावीत असतात. चलनाचे नियंत्रण हे बँकांच्या माध्यमातून होत असते. लोकांना पैसा पुरविणे, त्यांच्या पैशांचे संरक्षण करणे आणि त्यांना आवश्यकता पडेल तेव्हा ते पैसे त्यांना उपलब्ध करून देणे अशी महत्वपूर्ण कामे बँकांकडून पार पडली जातात. शिवाय लघुकालीन आणि दीर्घकालीन कर्जेही बँकांकडून दिली जातात.पूर्वीच्या वस्तूविनिमय पद्धती ऐवजी पैशांच्या सहाय्याने व्यवहाराला सुरुवात झाली आणि पैशांच्या सुरक्षेसाठी आणि नियंत्रणासाठी बँकेसारख्या व्यवस्थेची गरज भासू लागली. हळू हळू कालानुरूप बँकांच्या स्वरूपात, कार्यशैलीत आणि प्रकारांमध्ये बदल होत गेले. आजघडीला बँकांचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील :

राष्ट्रीय बँक

कोणत्याही देशाची एक राष्ट्रीय बँक असते. ही बँक थेट सामान्य ग्राहकांशी सबंधित नसते. त्या देशातील इतर बँकांवर देखरेख ठेवण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि आर्थिक पाठबळ देण्याचे काम ही बँक करीत असते. त्यामुळे ती बँकांची बँक म्हणूनही ओळखली जाते. थोडक्यात, राष्ट्रीय बँक त्या देशातल्या सरकारची बँक म्हणून काम करते. भारतीय रिझर्व्ह बँक भारताची राष्ट्रीय बँक आहे.

व्यापारी बँक

व्यापारी बँकांचा संबंध थेट ग्राहकांशी म्हणजेच तिच्या खातेधाराकांशी येत असतो. खातेधाराकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे, त्यांना हवे तेव्हा त्यांच्या खात्यातील पैसे उपलब्ध करून देणे, कर्जाऊ रकमा देणे अशा प्रकारची कामे व्यापारी बँका आपल्या दैनंदिन व्यवहारात पार पाडीत असतात. सरकारी बँका (स्टेट बँक ऑफ इंडिया), खाजगी बँका(वैश्य बँक) आणि परदेशी बँका(एचडीएफसी बँक) या तीन प्रकारच्या बँकांचा व्यापारी बँकांमध्ये समावेश होतो.

सहकारी बँक

सहकारी बँका या प्रामुख्याने सहकार तत्वावर चालतात. सर्वसाधारणपणे, आपल्या सभासदांना बँकिंगच्या सुविधा पुरविणाऱ्या सहकारी संस्थांना सहकारी बँका म्हणतात. मात्र सहकारी बँकांना रिजर्व्ह बँकेचे नियम पाळणे बंधनकारक असते. या बँकांचे कार्यक्षेत्र त्यांच्या सभासदांपुरतेच आणि मर्यादित स्वरूपाचे असते. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक सहकारी पतसंस्था, जिल्हा सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी पतसंस्था यांचा समावेश होतो.

विकासात्मक बँका

मोठमोठ्या उद्योगांना यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान किंवा व्यवसाय वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. यासाठी काही विशिष्ट बँका लघु व दीर्घकालीन कर्जे पुरवतात. त्यांना विकासात्मक बँका म्हणतात. उदा. इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन.

विशेष बँका

याव्यतिरिक्त काही बँका या विशेष क्षेत्रातच सुविधा पुरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या असतात. त्यामध्ये नाबार्ड, एक्झिम बँक यांचा समावेश होतो

Answered by Rahubansode
0

Explanation:

बँकेचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा

Similar questions