ब) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.
1) वेळेचा सदुपयोग.
Answers
'वेळ मिळतच नाही' ही सबब आपण व आपल्या अवतीभवतीचे लोक कायम पुढे करत असतात; पण वेळ मिळण्याची गोष्ट नाही तर वेळ काढावा लागतो. वेळेचे मोल समजून घेतले तर तो वाया घालविण्याचे आपण टाळू शकतो. वेळेचा सदुपयोग करून जीवनाचे साध्य आपण साधू शकतो, हे वनराज मालवी यांनी या पुस्तकातून सांगितले आहे.
आपले ध्येय गाठण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे, ध्येय गाठण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून मार्ग कसा ठरवाल, योजना कशी आखणार याबाबत मार्गदर्शन करून वेळेबाबतच्या पळवाटा, निर्णायक क्षण, असफलता, एकाच वेळी दोन कामे करण्याची चुकीची पद्धत, वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी मनोबलाची मदत कशी होते याचेही मार्गदर्शन यातून घडते.
वेळेचे नियोजन करताना झोपण्यापूर्वी दहा मिनिटे कशी वापरायची, लेखी नोंदींचा फायदा, विशिष्ट कामे करण्यासाठी वेळ काढणे, चालढकल करण्याची वृत्ती, दिरंगाई, त्यावर मात करण्याचा दृष्टीकोन यातून हातातील वेळेचा योग्य वापर करून आपली कामे कशी सुरळीत होतात, हे त्यांनी सांगितले आहे.
Explanation:
hope it helps you