बिल्ली का वर्णन करें please fast I have to write an eassy on this please guyys fast in marathi please
Answers
Answer:
मांजर हा मार्जार जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. जगातील व प्रदेशांत मांजर पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाते. मांजराला वाघांची मावशी असे म्हणतात, आणि वाघांना शिकार करायला मांजराने शिकवले आहे.
मांजर हा पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजराचे अनेक प्रकार आहेत. मांजर हा प्राणी अनेक रंगामध्ये असतो. मांजराचे मुख्य भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध आहे . क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते, परंतु असे आचरण साधारणतः क्षुधापूर्तीसाठी नसते. मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने, जेव्हा मांजर गवत खाते, अशा वेळेस, वमन क्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात. मांजर हा असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो. माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात पण मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात. मांजरं आपल्या उंचीच्या तिनपट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात. मांजर हे प्राणी जन्मतःपासून भांडखोर वृत्तीचे असतात. मांजरीण एकावेळी 3 ते 5 पिल्लांना जन्माला घालते.
Explanation: