History, asked by Dipalisomnathchaudha, 5 months ago

बाळ ज. पंडित रसमालोचन का रंजक होत असे​

Answers

Answered by sureshkumar8101
3

बाळ जगन्नाथ पंडित (जन्म : २४ जुलै १९२९; मृत्यू : १७ सप्टेंबर २०१५) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते.

वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते रणजी चषक सामन्यांत खेळले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ आणि वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. रोहिंग्टन बारिया चषक स्पर्धेतून क्रिकेट खेळल्यानंतर बाळ ज. पंडितांनी सन १९५९-६० च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली.

त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरू केले. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळे यांनी पंडितांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. क्रिकेट समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरांत पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचेही समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. दीर्घ काळ (४२ वर्षे) समालोचन करण्याबद्दल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'नेही याची दखल घेतली.

बाळ ज. पंडितांनी क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यांची ३० हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या 'पराक्रमी दौरा' आणि 'दी लिटल मास्टर' या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ’आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. त्‍यांनी रसरंग. क्रीडांगण,क्रीडाविश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केले आहे.

क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन आधी दि.ब. देवधरांनी सुरू केले आणि पंडितांनी ते लोकप्रिय केले. दोघांनीही मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द बनवले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे. मराठी वृत्तपत्रांत वापरले जाणारे षटक, षट्‌कार, चौकार, यष्टी, बाद, गोलंदाज, फलंदाज, सीमापार, आपटबार (बंपर) आदी क्रिकेटविषयक शब्द बहुधा पंडितांनी सुचविलेले आहेत.

जुन्या काळातील कर्नल सी.के. नायडू, क्रिकेटमहर्षी प्रा. दि.ब. देवधर, विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, फारूख इंजिनियर, चंदू बोर्डे, अजित वाडेकर यांच्यापासून ते सुनील गावसकरच्या युगातील गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या किती तरी खेळाडूंशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या खेळाडूंच्या शैलीचे बाळ पंडित नेमकेपणाने वर्णन करीत. ज्या काळात कार्यालये, दुकाने आणि घरांघघरांत लोक रेडिओला कान लावून क्रिकेट सामन्यांचे वर्णन ऐकत, अशा काळात बाळ पंडितांचे धावते वर्णन ऐकणे म्हणजे मेजवानी असे. 'फलंदाजाने चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सीमापार...' अशा पद्धतीचे वर्णन ते त्यांच्या विशिष्ट शैलीत करीत, तेव्हा मराठी रसिक त्याला दाद देत असत.

भारतीय क्रिकेट संघाचा १९७१ मधील ऐतिहासिक इंग्लंड दौरा, तसेच १९७४ व १९७९ मधील दौरा समीक्षक म्हणून त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या वेळची त्यांची वार्तापत्रेही गाजली होती. मूळचे क्रिकेटपटू असल्याने त्यांना या खेळाची सखोल जाण होती. त्यांच्याशी जुन्या काळातील क्रिकेटपटूंवर गप्पा मारणे म्हणजे एक मनस्वी आनंद असायचा. कर्नल सी.के. नायडू, विजय हजारे, बोर्डे, खंडू रांगणेकर, नाना जोशी, मधू रेगे, हेमंत कानिटकर यासारख्या किती तरी खेळाडूंचा खेळ त्यांच्या शब्दातून ऐकताना श्रोत्यांच्या माहितीत खूपच भर पडायची. पंडित यांनी क्रीडापटू, संघटक, लेखक आणि समालोचक अशा विविध भूमिकांतून मुशाफिरी केली. क्रिकेटवरील ते व्याख्यानेदेखील देत.

चेतन चौहान याच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी हे खेळाडू कोठे चुकतात, कोणती शैली वापरल्यास चौकार किंवा षटकार जाईल. गोलंदाजी करताना बळी मिळविण्यासाठी चेंडू कसा टाकला पाहिजे आदींबाबतही मार्गदर्शन केले होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सहसचिव आदी अनेक जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. या संघटनेला नावारूपास आणण्यात आणि पुणे शहरास आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संयोजन शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

बाळ पंडित एमए, एल्‌एलबी होते. एल्‌एलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळ ज. पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थावरही काम केले आहे. आळंदी देवस्थानचे देखील ते काही काळ (१९६६ ते १९९९) विश्‍वस्त होते. शिक्षण प्रसारक मंडळीं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

Similar questions