बाळ
ाजी विश्वनाशाच्या मुलांचे नावे सांगा ?
Answers
बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६२ – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
महादजी विसाजी देशमुख हे बाळाजींचे पणजोबा व भट घराण्याचे ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथांचे वडील व आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणतात. १५७५ च्या सुमारास महादजींकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजींस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजींस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हे बाळाजीचे पिता. बाळाजींना ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.