India Languages, asked by Anuja5312, 6 months ago

बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे , हेच श्रेयस्कर असते. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by rajraaz85
7

Answer:

           बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर या वाक्यातून असे लक्षात येते की व्यक्तीने फक्त बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपले कार्य सिद्ध केले पाहिजे.

Explanation:

          आपण समाजामध्ये बघतो असे भरपूर लोक असतात जे फक्त बोलण्यातून अनेक प्रकारचे आश्वासने देत असतात. पण त्या दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन ते आपल्या कृतीच्या माध्यमातून सिद्ध करत नाहीत. मग अशा बोलण्याला काही अर्थ नसतो. कारण फक्त बोलून कुठल्याही समाजात तुम्ही बदल घडवून आणू शकत नाही. जर तुम्हाला बदल घडवून आणायचा असेल तर ते तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. जेही तुम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात ते प्रत्यक्ष तुमच्या कृतीतून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण बोलणाऱ्या पेक्षा करणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो. समाजात असे भरपूर समाज सुधारक होऊन गेलेत ज्यांनी आपल्या कृतीतून समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे असे अनेक समाजसुधारकांनी आपल्या कार्यातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले व समाजात सुधारणा घडवून आणली.

Similar questions