बालसाहित्यिका: गिरीजा किर या पाठच्या आधारे साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट कर.
Answers
Explanation:
बालसाहित्यिका: गिरीजा किर या पाठच्या आधारे साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट कर.
please mark as brilliant
Answer:
गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो, गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.