बेरोजगारी, बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख
Answers
*बेरोजगारी ,बेकारी एक भीषण समस्या*
बेरोजगारी खरंच एक भीषण समस्या म्हणून देशाचा प्रगतीसमोर उभी राहिली आहे. पात्रता असूनही रोजगाराच्या कामामुळे, बेरोजगारी अधिक वाढली आहे. अनेक पदवीधारक कामाचा कामामुळे घरीच बसले आहेत. लोकांपेक्षा नोकऱ्या कमी आहेत. कामाचे योग्य मूल्य न दिल्यामुळेसुद्धा बेरोजगारी वाढत आहे. देशाची लोकसंख्या जितकी आहे त्याचा तुलनेमध्ये रोजगार खूप कमी आहे. सर्वांना नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.
बेरोजगारवाढीचे दुसरे कारण म्हणजे वाढते तंत्रज्ञान. आता सर्व कामासाठी तांत्रिक मदत उपलब्ध झाली आहे. माणसांचा जागी यंत्र काम करू लागले आहेत आणि म्हणून मनुष्यबल कमी प्रमाणात वापरले जाते.
एकच पदवी घेतलेले गरजेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे स्पर्धा वाढत चालल्य आहेत. एका नोकरीसाठी हजारो लोक प्रयत्न करता पण त्यात एकालाच जागा मिळणार असते.
बेरोजगारी नष्ट झाल्याशिवाय देशाची भरभराट होणे थोडे कठीण आहे.