• (२) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक
वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा
Answers
(1)नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे य्वाय असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते.
(2) विशिष्ट प्रकारचे खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात, तेथे तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणीही मोठ्या प्रमाणावर आढळतात.
(3) ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध
जातींची हरणे आढळतात. परिणामी हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात.
(4) उदा. भारतामध्ये गवताळ प्रदेशात किटक आढळतात व त्यांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी सुद्धा आढळतात.
(5) सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते, तेथे वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात.
(6) उदा., ब्राझीलमधील विषुववृत्तानवळ घनदाट जंगल
आहे. परिणामी येथे विविध प्राणी, पक्षी व कीटक
आढळतात. -
(7)ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पती कमी असतात तेथे वन्य प्राणी व पक्षी कमी आढळतात.
8) [उदा., भारतात वाळवंटी प्रदेशात कमी वनस्पती असल्याने तेथे मर्यादीत प्राणी व वनस्पती आढळतात.