Geography, asked by saniyamakandar22, 3 months ago

ब्राझीलचे 'पश्चिमेकडे चला' धोरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
7

Answer:

ब्राझीलचा विचार करता, ब्राझीलमध्ये सावो पावलो या राज्यात केंद्रित वस्ती आढळते व भारतामध्ये दिल्ली तसेच चंदीगढमध्ये मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आढळते.

ब्राझील : पश्चिमेकडे चला

[इमेज स्त्रोत - इयत्ता दहावी भूगोल पाठ्यपुस्तक (महाराष्ट्र बोर्ड)]

ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत.

सावो पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे. या प्रदेशात खनिजाचा मुबलक साठा आहे. या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. येथे वाहतुकीच्या सोईही चांगल्या विकसित झाल्या आहेत. वरील सर्व कारणांमुळे ब्राझीलमध्ये आग्नेय व दक्षिण दिशेला मानवी वस्ती केंद्रीत होत असल्याचे दिसते.

त्याचबरोबर पश्चिमेकडे असलेल्या भागातील रोगट हवामान, साधनसंपत्तीचा शोध व वापर यांवर निसर्गतःच मर्यादा, वाहतुकीच्या कमी सोयी यांमुळे त्या भागात लोकसंख्या विरळ आहे.

परंतु देशातील फक्त काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे केंद्रीकरण लक्षात घेता ब्राझील सरकारने ‘पश्चिमेकडे चला’ या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. या धोरणामुळे लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल.

Similar questions