ब्राझीलच्या पाच प्राकृतिक विभागांची माहिती लिहा
Answers
Answer:
ब्राझील : दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळ व लोकसंख्या यांनुसार सर्वांत मोठे प्रजासत्ताक संघराज्य. येथील ब्राझील वुड या वृक्षांमुळे पोर्तुगीजांनी देशाला ‘ब्राझील’ हे नाव दिले. या देशाने दक्षिण अमेरिकेचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला असून आकाराच्या दृष्टीने याचा रशिया, कॅनडा, चीन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५० १६’ उ. ते ३३० ४५’ द. व ३४० ४५’ प. ते ७४० ३’ पश्चिम यांदरम्यान असून पूर्व पश्चिम कमाल लांबी ४,३२८ किमी. व उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात. म्हणजेच चिली व एक्वादोर वगळता द. अमेरिकेतील सर्व देशांच्या सीमा ब्राझीलच्या सीमेला येऊन भिडलेल्या आहेत. देशाच्या आग्नेय, पूर्व व ईशान्य सीमा (सु. ७,८८६ किमी.) अटलांटिक महासागराने व्यापलेल्या असून द. अमेरिकेच्या एकूण किनारपट्टीच्या १/४ किनारपट्टी एकट्या ब्राझीलला लाभली आहे. फेरनँदू दी नुरोन्या आणि रोकस या बेटांसह ईशान्य किनाऱ्यालगतच्या २४० किमी. पर्यंतच्या सागरप्रदेशातील अनेक लहान बेटांचा समावेश ब्राझीलमध्ये होतो. ब्राझील्या (लोकसंख्या ४,११,३०५ १९८०) ही ब्राझीलची राजाधानी आहे.
Explanation:
plz mark me brain list plz like me all of you you can like me I helping all of you