Geography, asked by vaishnavipanchras05, 1 month ago

ब्राझीलमध्ये सरासरी लोकसंख्येची घनता किती आहे?​

Answers

Answered by sanketkoladiya1811
0

Answer:

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

Explanation:

क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे १९ कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७% लोकसंख्या वास्तव्यास आहे.

ब्राझीलमध्ये लोकसंख्यावाढीचा दरदेखील कमी होताना दिसून येतो, म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे.

या सर्व कारणांमुळेच ब्राझीलचे आकारमान जास्त असले तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.

Similar questions