History, asked by shraddhajadhav7219, 1 month ago

ब्रिटिशांच्या प्रांतिक प्ररशासनाविषयी तपशिलवर माहिती द्या​

Answers

Answered by bhushakale52
1

Explanation:

केट गॅरोड ही ब्रिटीश स्त्री इतिहासात उल्लेख यावा एवढी महत्त्वाची नाही, ती एक सामान्य गृहिणी होती. तिचा नवरा ब्रिटिश अमदानीत निर्माण झालेल्या पी.डब्ल्यू.डी.मध्ये इंजिनीअर होता. नवऱ्यासोबत केट भारतात अठ्ठावीस वर्षे राहिली. पण भारताशी, भारतीयांशी कणभरही समरस होऊ शकली नाही. तिची ही प्रतिक्रिया ब्रिटिश भारतातील ब्यूरोक्रसी कुटुंबीयांची प्रातिनिधिक मानता येईल!

ब्रिटनने जेव्हा भारतीयांना आय.सी.एस. परीक्षेची व नोकरीची कवाडे खुली केली तेव्हा त्याचा फायदा घेऊन ज्या अनेक कर्तबगार भारतीय प्रशासकाची परंपरा सुरू झाली, त्यातील एल. के. झा हे एक अव्वल दर्जाचे आय.सी.एस. ऑफिसर. त्यांनी ब्रिटिश आय.सी.एस. ऑफिसरच्या हाताखाली व सोबत काम केलं होतं. त्यांनी टिपिकल ब्रिटिश आय.सी.एस.बद्दल एक छान किस्सा (अर्थातच खरा) सांगितला आहे. तो प्रथम मी टीकेविना उद्‌धृत करून व मग भाष्य करतो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या ब्रिटिश आय.सी.एस. अधिकाऱ्यांचा इंग्लंडमध्ये 1958 साली (त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल) सत्कार करण्यात आला व त्यांच्या सेवेची इंग्लिश लोकांना कायमची आठवण राहावी म्हणून वेस्ट मिन्स्टर ॲबे या प्रतिष्ठित चर्चमध्ये एक कोनशिला राणीच्या हस्ते बसवण्यात आली. त्या कोनशिलेवर आय.सी.एस. अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ खालीलप्रमाणे मजकूर कोरण्यात आला. ‘Let them not be forgotten for they served India well.’ त्याखाली बायबलमधील एक कोटेशन होतं, त्यात 'They walk humbly among the people.' असं एक वाक्य होतं. त्याला आय.सी.एस. असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला व ते कोनशिलेवर उद्‌धृत करू नये असं निवेदन राणीला दिलं. राणीनं पंतप्रधान लॉर्ड ॲटलीशी विचारविनिमय केला व वरील बायबलचं कोटेशन (ज्यात नम्रतादर्शक विशेषणं आय.सी.एस. अधिकाऱ्यांना लावलं होतं) कोनशिलेतून काढावं अशी आज्ञा दिली, व ते तसं काढण्यातही आलं!

दीडशे वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना बऱ्याच चांगल्या दर्जाचं प्रशासन दिलं, हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यात अर्थ नाही. त्यात मोठा वाटा ‘स्टिल फ्रेम’ ब्युरोक्रसीचा व त्याचेच प्रमुख अंग असलेल्या ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ अधिकाऱ्यांचा आहे. पण जन्मजात श्रेष्ठतेचा अहंकार, नसानसात भिनलेला वंशवाद आणि ‘वुई आर बॉर्न टु रूल प्रिमिटिव्ह इंडिया’ ही रक्तात भिनलेली वृत्ती यामुळे नम्रता या मानवी गुणाचा त्यांना विसर पडला होता. म्हणून त्यांच्या सेवेच्या गौरवार्थ बसवलेल्या कोनशिलेवर बायबलमधील कोटेशन ‘They walk humbly among the people.’ त्यांना रुचले नाही. एका अर्थाने ते प्रामाणिक होते व प्रांजळपणे त्यांनी हेच अधोरेखित केलं होतं की, त्याचं भारतीयाशी वर्तन हे शासकाचं व मालकाचं म्हणून अहंकारांनी भरलेलं होतं!

ब्रिटिशांनी त्यांच्या दीडशे वर्षाच्या शासनकाळात प्रशासनाची आधुनिक यंत्रणा कशी विकसित केली हे आपण मागील दोन अध्यायात विस्तारानं पाहिलं आहे. आज ब्रिटिश प्रशासकाची वृत्ती, जीवनशैली व त्यांच्या प्रशासनाचे काही वेगळे पैलू पाहणार आहोत. त्यासाठी मी डेव्हिड गिलमर यांच्या ‘दि रूलिंग कास्ट’ व वायबेन ब्रेंडन यांच्या ‘चिल्ड्रन ऑफ राज’ आणि काही इंटरनेट वेबसाईटवरून मिळालेल्या लेखांचा आधार घेतला आहे. याखेरीज ब्रिटिश काळात आय.सी.एस. झालेले व स्वतंत्र भारतातही सेवा देणाऱ्या प्रशासकांच्या आठवणी व टीकाटिपणीच्या आधारे ब्रिटिश प्रशासकांच्या मानवी पैलूचा परामर्श घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे.

भारतातील ब्रिटिश साम्राज्यशाही हा प्रदीर्घ कालखंडाचा व महत्त्वाचा अनुभव आहे. भारत ब्रिटिशांसाठी काय होता? याचं नेमकं वर्णन एका आय.सी.एस. अधिकाऱ्याने केलं, ते याप्रमाणे आहे. "India has always retained an exotic, fareway and seductively oriental appeal in the British imagination. Above all, India Symbolised Imperial grandeur, and seemed to underwrite Britain's Superpower status for the most of the nineteenth century and some of the twentieth- as the Viceroy Lord Curzon expressed it, a touch dramatically, in 1901. "As long as we rule India, we are the greatest power in the world. If we lose it we shall drop straight way to a third rate power."

ब्रिटिश साम्राज्यावर कधीही सूर्य मावळायचा नाही असं एके काळी म्हटलं जायचं, कारण पंचखंडात त्यांच्या साम्राज्याचा विस्तार होता आणि या साम्राज्यामध्ये भारत हा ‘ज्वेल इन क्राऊन’ होता. त्यामुळे त्यांची महासत्ता होती. भारत स्वतंत्र होताच त्यांची महासत्ता लयास गेली. आज साठ वर्षानंतर इंग्लंड जागतिक सत्तास्पर्धेत कुठे आहे? तो अमेरिकेचे बोट धरून त्यांच्या धोरणाची री ओढणारा एक नगण्य देश बनला आहे. ते असो.

पण वरील निरीक्षण अत्यंत मार्मिक व ब्रिटिश राज्यकर्ते आणि प्रशासकांच्या वृत्तीवर नेमका प्रकाशझोत टाकणारं आहे, यात शंका नाही. आय.सी.एस. व अन्य प्रशासकांना भारतात येऊन विविध पदावर काम करताना अक्षरश: ‘अहम्‌ ब्रह्मास्मी’असंच वाटायचं. त्यांचा साम्राज्यशाही दर्प, भारतीयांना कस्पटासमान लेखायची वृत्ती आणि तुच्छता यातूनच भारतीयांचा स्वाभिमान जागृत झाला हे ऐतिहासिक वास्तव आहे.

.

‘ब्रिटिश कलेक्टरांचे जिल्ह्यातील दौरे, विविध भागात न्यायालये भरवणे, त्यांचा रूबाब, ऐश्वर्य, दरारा आणि दूर-दराज भागात मुक्काम केला तरी सामान्य नागरिकांपासून अंतर राखणे आणि न्यायदान करताना जबरी शिक्षा करणे याद्वारे जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यात ब्रिटिश प्रशासक विशेषत: कलेक्टर, पोलिस अधिकारी व भारतीय राजांच्या दरबारातील पोलिटिकल एजंट निष्णात बनले होते.’

Similar questions