Biology, asked by vj6528504, 1 month ago

ब्रिटिशांनी केलेल्या शिक्षण सुधारणांची सचित्र माहिती तयार करा​

Answers

Answered by khushivgowda
3

Answer:

my friends dog died so sad

Attachments:
Answered by aayushav06
13

ब्रिटिश वसाहतवादी शासकांनी शिक्षणामध्ये रस दाखविला नाही. पण सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनरीज पुढे सरसावले. बॅप्टीस्ट मिशनरी विल्यम केरी हे इसवी सन १७९३ मध्ये भारतात आले. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने सन १८०० मध्ये सेरामपूर येथे बॅप्टीस्ट मिशनरीची स्थापना केली. त्यांच्या उत्साहामुळे आसपासच्या ठिकाणी बऱ्याचशा प्राथमिक शाळा सुरू झाल्या. त्याकाळात काही उदारमतवादी भारतीय आणि परकियांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी अशासकीय शाळांची स्थापना केली. त्यातील संस्मरणीय व्यक्तींमध्ये राजाराम मोहन राय, राजा राधाकांत देब, बुर्दवानचे तेजचंद्रराय बहादूर आणि स्कॉटलंडचे घड्याळजी, डेव्हीड हेअर यांचा समावेश होतो. राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे पितामह म्हणून संबोधले गेले. इसवी सन १८१५ मध्ये स्वप्रयत्नाने त्यांनी अँग्लो हिंदू शाळेची स्थापना केली. त्यांनी स्वतः इसवी सन १८०० मध्ये चिनसुराह व भवानीयूद येथे सन १८४८ मध्ये दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना केली. काही उत्साही भारतीय आणि असैनिक इंग्रजांनी पुढे येऊन १८१७ मध्ये कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. जे आताचे प्रेसिडेन्सी कॉलेज होय.

सन १८१३ च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी एक लाख रुपये प्रतिवर्ष या प्रमाणे निधीला मंजुरी देण्यात आली. काही जणांचे म्हणणे होते की, ही रक्कम इंग्रजी शिक्षणासाठी खर्च करावी. राजाराम मोहन राय हे या पैशाचा विनियोग पाश्चिमात्य शिक्षणासाठी व्हावे या मताचे होते. पण त्यांचे म्हणणे काही मान्य झाले नाही. सन १८२३ मध्ये जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनच्या सूचनेनुसार ही रक्कम पौर्वात्य शिक्षणावर खर्च करण्याचे ठरविण्यात आले व इसवी सन १८२३ मध्ये कोलकाता येथे संस्कृत महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Similar questions