बेसॉल्ट कोनत्या
प्रकारचा खडक आहे.
Answers
Answer:
बेसाल्ट : गडद रंगाच्या, घट्ट, अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या ) आणि लोह व मॅग्नेशियम यांचे प्रमाण सापेक्षतः जास्त असलेल्या ज्वालामुखी (अग्निज ) खडकांचा गट.
गुणधर्म व संघटन : बेसाल्ट भूपृष्ठावर सर्वात विपुलपणे आढळतो. हा सूक्ष्मकणी ते घट्ट असून याचे वयन (पोत ) व संरचना निरनिराळी असल्याने भौतिक गुणधर्म विविध प्रकारचे असतात. याचे सरासरी वि. गु. २.८५ परंतु पोकळ्यायुक्त प्रकाराचे वि. गु. २.६ ते २.७ आणि रंग सामान्यपणे निळसर ते हिरवट काळा, कधीकधी गडद करडा वा तपकिरी असतो. ज्या लाव्हापासून बेसाल्ट बनतो त्याचे तापमान १,०००० ते १,२२०० से., श्यानता (दाटपणा ) १०३ ते १०६ पॉइज (१ पॉइज म्हणजे पाण्याच्या १०० पट दाटपणा होय ) आणि पृष्ठताण २७० ते ३५० डाइन/सेंमी. असतो [⟶ पृष्ठताण ]. बेसाल्ट हा खोल जागी तयार होणाऱ्या ⇨ गॅब्रो या खडकाशी तुल्य असा ज्वालामुखी खडक आहे. कॅल्शियमाचे प्रमाण जास्त असणारी प्लॅजिओक्लेज (लॅब्रॅडोराइट) व पायरोक्सीन (ऑजाइट ) ही बेसाल्टाची आवश्यक खनिजे असून ती जवळजवळ समप्रमाणात असतात आणि यातील इतर खनिजे आकारमानाने २० टक्क्यांपेक्षा कमी असतात. ऑलिव्हीन, कॅल्शियमाचे प्रमाण कमी असणारे पायरोक्सीन इ.खनिजे, कधीकधी सल्फाइडी खनिजे व काचही बेसाल्टात असते. ऑलिव्हिनाचे सामान्यपणे सर्पेटाइनात रुपांतर झालेले आढळते. मॅग्नेटाइट, इल्मेनाइट व कधीकधी लिमोनाइट ही बेसाल्टातील गौण खनिजे असून सर्व लोह ऑक्साइडांचे एकूण प्रमाण १० टक्क्यांपर्यंत असू सकते. पैकी मॅग्नेटाइट हे पृथ्वीचा चुंबकीय इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. क्वचित हॉर्नब्लेंड, कृष्णाभ्रक, ल्यूसाइट, नेफेलीन, ॲनॅलसाइम, ॲपेटाइट, कॉर्ट्झ इ. खनिजे व धातुरुप लोह ही बेसाल्टात, आढळतात.
आढळणारी रुपे : बेसाल्ट सामान्यतः लाव्हा प्रवाहांच्या कधीकधी लहान भित्ती (खडकांच्या थरांना छेदून जाणाऱ्या व समांतर पृष्ठे असलेल्या भेगांत शिलारस थिजून बनलेल्या भिंतीसारख्या राशी) व शिलापट्ट (खडकांच्या दोन थरांमध्ये थरांच्या रुपांत तर क्वचित काचमय, तंतू . रुपांतही आढळतो.
वयन व संरचना : लाव्हा कोणत्या स्थितीत व कसा थंड झाला यांनुसार बेसाल्टातील विविध संरचना, वयन व खनिजांचे स्वरुप ही ठरतात. जलदपणे थंड झालेला लाव्हा सूक्ष्मस्फटिकी होतो, तर सावकाश थंड झालेल्या लाव्ह्यात चांगले व मोठे स्फटिक तयार होतात. कधीकधी मोठे स्फटिक उद्गिरणापूर्वीच (उद्रेकापूर्वीच) बनलेले असतात. अशा तऱ्हेने एकाच लाव्हा प्रवाहात विविध आकारमानांचे स्फटिक आढळतात व त्यामुळे बेसाल्ट वयन सामान्यतः पृष्युक्त (सूक्ष्मकणी आधारकात मोठे स्फटिक–येथे फेल्स्पार, ऑजाइट आणि ऑलिव्हीन यांचे विखरलेले असे) असते. कधीकधी फेल्स्पाराच्या पात्यासारख्या स्फटिकांमधअये ऑजाइटाचे स्फटिक (वाउलट) वेढले गेलेले आढळतात. अशा वयनाला सर्पचित्रित वयन म्हणतात.
थंड होताना लाव्ह्याचे कुंचन होते त्यामुळे त्याच्या पृष्ठाला काटकोनात म्हणजे उभे संधी (तडे) निर्माण होतात. या संधीमुळे लाव्हाप्रवाहात स्तंभाकार संरचना तयार होते. हे स्तंभ सामान्यतः षट्कोणी तर कधीकधी ३ ते ९ बाजूंचे असतात. असे संधी हे कित्येक बेसाल्टांच वैशिष्ट्य आहे. उदा., मुंबईची गिल्बर्ट टेकडी, आयर्लंडमधील जायंट्स कॉजवे इत्यादी. [⟶जावालामुखी–२ दक्षिण ट्रॅप].
बेसाल्टाचे रासायनिक संघटन विविध प्रकारचे असून ही विविधता विविध परिस्थितींशी निगडित असते. अशा तऱ्हेने वयन, संरचना व संघटन यांवरून बेसाल्टाच्या उत्पत्तीविषयी व लाव्हा कोणत्या परिस्थितीत बाहेर पडला याविषयी निष्कर्ष काढता येतात.
प्रकार : भूपृष्ठावर थिजलेल्या लाव्हा प्रवाहाचे पृष्ठ खडबडीत वा स्पंजासारखे सच्छिद्र सते कारण लाव्ह्यातील वायू व वाफ बुडबुड्यांच्या रुपात बाहेर पडताना पृष्ठांवर असंख्य छिद्रे व पोकळ्या निर्माण होतात. लाव्हा प्रवाहाचे पृष्ठ सपाट वा गुळगुळीत असल्यास त्याला ‘पाहोहो’ आणि अशा पृष्ठाच्या व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या लाव्ह्याला ‘ठोकळ्या’ किंवा ‘आआ’ लाव्हा म्हणतात. पाण्याखाली किंवा पाणथळ जमिनीवर थिजलेला लाव्हा एकमेकांवर ठेवलेल्या लोडांसारखा दिसतो, म्हणून त्याला ‘गिरदी’ लाव्हा म्हणतात [⟶जावालामुखी–२]. बेसाल्टामध्ये नळीच्या आकारच्या पोकळ्याही आढळतात. या पोकळ्याही वरीलप्रमाणे बनलेल्या असतात. कधीकधी या पोकळ्यांमध्ये नंतर विद्रावांद्वारे क्वॉर्टझ, झिओलाइटे, कॅल्साइट यांचे चांगले स्फटिक कधीकधी प्रेहनाइट, क्लोराइड आणि क्वचित धातुरुप तांबे साचलेले आढळते. अशा बेसाल्टांना ‘कहरयुक्त’ व ‘भरित कुहरी’ बेसाल्ट म्हणतात.