Art, asked by saminars7865, 5 months ago

बा शाळेतील पहिला दिवस यावर दहा ओळी लिहा: गुण-५​

Answers

Answered by shreyasadanadan
13

Answer:

उन्हाळ्याची सुट्टी मस्त दोन महिने मजेत घालवून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शाळा सुरु होते. शाळा सुरु होण्याआधी सर्व मुलांचा शाळेसाठी नवीन-नवीन वस्तू आणण्यासाठी पालकांकडे हट्ट सुरु होतो. नवीन वस्तू मिळाल्या की कधी एकदाची शाळा सुरु होते असे सर्वांनाच वाटते. नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन वह्या अशा सर्व नवीन वस्तू मिळालेल्या असताना शाळेचा पहिला दिवस कधी उजाडतो असे वाटते. नवीन वर्ग, मित्र-मैत्रिणी मिळणार या उत्सुकतेने पहिल्या दिवसाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. शाळेचा पहिला दिवस कोणीच विसरू शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, सर्वांच्याच शाळेच्या पहिल्या दिवसाच्या काही खास आठवणी असतात.

Similar questions
English, 10 months ago