बातमी लेखन-
3 जानेवारी रोजी आदर्श विदयालय नगर था
शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची
| जयंती साजरी करण्यात आली.
Answers
Answer:
आदर्श विद्यालय शाळेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा
दिनांक -४ जानेवारी, नगर: काल शहरातील आदर्श विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा सोहळा पार पडला. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या प्रांगणात जमले होते. शाळेतील मुख्याध्यापक श्री. डी.जे. तिवारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
मुख्याध्यापकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील एक छोटासा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केला. काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवन दर्शन घडवण्यासाठी भाषणे दिली. शाळेतील शिक्षक श्री.अनुज शर्मा यांनी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाईं बद्दल व त्यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला.
Explanation:
आदर्श विद्यालयात
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
आमच्या वार्ताहराकडून -
नगर दिनांक 3 जानेवारी - नगर मधील आदर्श विद्यालयात क्रतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती 3जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.