२) बातमी लेखन
'१२ जानेवारी विवेकानन्द जयंती', राष्ट्रीय युवा दिल प्रशालेत साजरा करण्यात
आला या समारंभाची बातमी तयार करा,
Answers
Answer:
स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा देशभरात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत.
भारतातील थोर पुरुष आणि महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा देशभरात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत.
Answer:
स्वामी विवेकानंद जयंती, म्हणजेच युवा दिन गुरुवारी शाळा, महाविद्यालयांसह स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम राबवत उत्साहात साजरा केला. यानिमित्त विवेकानंदाच्या विचारावर आधारित व्याख्यान, स्पर्धा घेण्यात आल्या.
न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कॉलेज प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे यांनी युवा दिनाचे औचित्य साधून अवयव दानाचा संकल्प केला. त्याबाबतचे निवेदन कानडे यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले. शहर भाजपाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिमांड होम येथील अनाथ मुलांना शंभर किलो धान्य देण्यात आले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श विचारांची युवा पिढीला गरज असल्याच्या भावना युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सांगितले, ‘युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातूनच शक्य आहे. युवकांनी रुढी, परंपरा झुगारून सक्षम भारत घडविण्यासाठी सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे,’ असे आवाहनही गोडसे यांनी केले