History, asked by PRATIKkhamkar, 10 hours ago

बातमी लेखन कोविड-१९ लसीकरण मोहिमेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.​

Answers

Answered by sainathbdeshmukh
2

Answer:

नवी दिल्ली : देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अशा बड्या नेत्यांसहीत देशातील सामान्य नागरिकांनीही करोना लसीकरणात सहभाग घेतला. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास १.२८ लाख नागरिकांनी करोना लसीचा डोस घेतला. तर एकाच दिवसात तब्बल २५ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी पोर्टलवर नाव नोंदणी केलीय.

undefined

Covid 19 Vaccination FAQ : आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी काय करावं लागेल...

आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी ६० वर्षांहून अधिक वयाच्या एकूण १ लाख २८ हजार ६३० लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला. सोबतच ४५ वर्षांहून अधिक परंतु गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या १८ हजार ८५० जणांनी करोना लस घेतली. भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आत्तापर्यंत एकूण १.४७ कोटी नागरिकांना करोना लस देण्यात आलीय.

दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी नाव नोंदणी करणाऱ्या २५ लाखांपैंकी २४.५ लाख सामान्य नागरिक आहेत तर उरलेले आरोग्य कर्मचारी आणि करोना योद्धे आहेत. भारतात १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय.

undefined

कोविड १९ लसीकरण : सामान्यांना नाव नोंदणीसाठी CoWIN खुलं

undefined

Assembly Elections 2021 : पंतप्रधान मोदींच्या लसीकरणाशी बंगाल, केरळ, पुदुच्चेरीचा असाही संबंध...

लसीकरण नोंदणी पोर्टलद्वारेच

प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेलं 'कोविन' हे मोबाईल अॅप केवळ प्रशासकीय बाबींसाठी वापरल जाणार आहे. लसीकरणाची नोंदणी आणि वेळापत्रक यासाठी पोर्टलचा वापर करावा लागेल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिक आणि विशिष्ट व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी करण्यात अनेक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मंत्रालयाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. नोंदणी आणि लसीकरणासाठी वेळ घेण्यासाठी www.cowin.gov.in या पोर्टलवर जावं लागणार आहे. तर प्ले स्टोअरवरील अॅप केवळ प्रशासकीय बाबींसाठी वापरले जाईल, असं मंत्रालयाच्या ट्वीटमध्ये म्हटलं गेलंय.

लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

amit shah : PM मोदींनंतर गृहमंत्री अमित शहांनीही घेतली करोनावरील लस

१ मार्चपासून ६० वर्षांवरील प्रत्येक जण आणि व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविडची लस सरकारी आरोग्य केंद्रांवर मोफत तर काही खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क (२५० रुपये) दिली जात आहे. नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी वेळ ठरवू शकतात. नागरिकांना जवळच्या केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष नाव नोंदणीही करता येणार आहे. योग्य लाभार्थी आपल्या सोयीचे केंद्र आणि वेळ निवडू शकतात. १ जानेवारी, २०२२ ला जे नागरिक ६० वर्ष पूर्ण करत आहेत किंवा ज्यांनी त्याआधीच ही वयोमर्यादा गाठली आहे, ते ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी नोंदणी करू शकतात. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील विशिष्ट २० प्रकारच्या व्याधी असलेले नागरिकही नोंदणीस पात्र आहेत.

नागरिक कोविन पोर्टल त्यांच्या मोबाइलवरून वापरू शकतात. ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावानं 'कोविन'वर खातं उघडलं जाईल. मोबाइल क्रमांक वापरून ती व्यक्ती हे खातं वापरू शकेल. या खात्याद्वारे नवे लाभार्थी नोंदवणं नोंदींमध्ये बदल करणं आणि लसीकरणाची वेळ ठरवणं या बाबी करता येतील. जसजसे त्या क्रमांकांवरून नोंदवलेल्या व्यक्तींचे लसीकरण पूण होईल, तसे त्या लाभार्थ्याचे नाव यादीतून रद्द करता य

Similar questions