२) बातमी लेखन -मुंबईतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यशस्वीरित्या कोविड प्रतिबंधक लस
देण्यात आली,या विषयावर बातमी तयार करा.
Answers
Explanation:
भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे असा दावा देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला होता.
हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत जुलैमध्ये करार केला होता. क्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचं आयसीएमआरने म्हटलं होतं.
आता 15 ऑगस्ट उलटून गेला आहे. तेव्हा या लसीचं काम कुठवर आलं आहे.
'पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची कोरोना लस 250 रुपयांना मिळणार'
रशियाची कोरोनावरील लस 15 ऑगस्टला येणार?
देशभरातली कोरोना रुग्णांची तसंच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत
★ बातमी लेखन :
मुंबईतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यशस्वीरित्या कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली
सामना वृत्तसेवा,
मुंबई, ता. 31 संपूर्ण विश्वाला अजगरा प्रमाणे गिळंकृत करणार्या कोरोना यावर प्रतिबंध करणारी लस काल मुंबई येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यश आले.
कोरोना याच्या विळख्याने संपूर्ण जग हादरवून सोडले. पण यावर मात करणारी प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून या लसीकरणासाठी प्राधान्य वैद्यकीय तज्ञ तसेच वैद्यकीय कर्मचारी यांना देण्यात आले.
कोविड प्रतिबंधक लस वैद्यकीय कर्मचारी यांनी घेतल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोना पासून संरक्षण मिळेल तसेच त्याचे काही परिणाम आढळून आल्यास ही लस घ्यायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल असे ठरविले होते या सर्व विचाराअंती काल वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
यासंदर्भात बॉम्बे रुग्णालय, पी डी हिंदुजा, लीलावती रुग्णालय इत्यादी. अशा अनेक ठिकाणी लसीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी काही दिवसांपूर्वी केली होती.
कोविन ॲप मध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्यावर पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.