बातमी लेखन
स्वातंत्र्य दिवसानिमित शहरांसह ग्रामीण
भागात ध्वजारोहण व संस्कृतीक कार्यक्रम संपत्र.
Answers
Answer:
लोककल्याण
प्रतिनिधी दि. १७ अॉगस्ट, २०२०
Explanation:
स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा
१५ अॉगस्ट रोजी शहरामध्ये व ग्रामीण भागात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा - महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
विविध शाळांमार्फत एक सामाईक प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेऊन "भारत माता की जय", "वंदे मातरम्" अशा घोषणा देत एकतेचे प्रतीक सर्वांना दाखवले. शाळांमध्ये सुंदर सजावट करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यावर काही विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर केले. तसेच शाळेतील काही कलावंतांना व खेळाडूंना राज्य पातळीवरील शाळेचे नाव उंचावल्यामुळे यावेळी बक्षीस देण्यात आले.
शहरातील शासकीय कार्यालयांत मा. आमदार श्री. भरत काळे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला. ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील तसेच ग्रामीण भागातील गरीब लोकांना कपडे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागात १५ अॉगस्ट दिवशी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिन सर्वत्र निरनिराळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाप्रमाणे दररोजच सर्वांनी देशाप्रती प्रेम व आपली कर्तव्ये पार पाडावीत, असाच एक संदेश या कार्यक्रमांतून मिळाला.