:
(२) बातमीलेखन
•'तुमचा परिसर कोरोनामुक्त झाला' असे शासनाने जाहीर केले, या
घटनेची बातमी तयार करा,
Answers
Answer:
करोना व्हायरसचा (Covid-19)संसर्ग झाला आहे की नाही? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. करोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे थ्रोट स्वॅब (घशातील त्वचेचे नमुने) आणि नेझल स्वॅबचे (नाकातील त्वचेचे नमुने) नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही? हे ठरवलं जातं. अन्यथा, तुम्हाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी क्वारेंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे.
Explanation:
pls mark me as brainlist
Answer:
मुंबई: गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या राज्यातील जनतेसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला असून गेल्या 14 दिवसांपासून फुलंब्रीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त तालुका होण्याचा मानही फुलंब्रीला मिळाला आहे. (Maharashtra’s phulambri Taluka is corona free)
राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोनाची सर्वाधिक संख्या आढळून आली होती. तिन्ही ठिकाणी दिवसे न् दिवस करोनाची संख्या वाढत चालल्याने या शहरांमध्ये अनेकदा कडक लॉकडाऊनही करण्यात आला होता. अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती. तोंडावर मास्क लावण्यापासून ते मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारण्यापासूनच्या अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून या तिन्हीकोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. औरंगाबाद जिल्हाही आता हळूहळू कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुका जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त झाला आहे. गेल्या 14 दिवसांत फुलंब्री तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलं.