India Languages, asked by ruthhh27, 7 months ago


बातमीलेखन-
तुमच्या शाळेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाची बातमी तयार करून लिहा.
स्थळ, वेळ, व्यक्ती, कार्यक्रम, यांचा उल्लेख करा
प्रमुख अतिथी शास्त्रज्ञ
जयंत नारळीकर
विविध विज्ञान
विषयांचे चर्चा सत्र
पालक व विद्यार्थी
सामील​

Answers

Answered by saraswatikharve
22

Explanation:

this is a answer of your question please make me brainlist please......................

Attachments:
Answered by rajraaz85
0

आदर्श विद्यालय नाशिक यांनी आयोजित केले विज्ञान प्रदर्शन

२३ फेब्रुवारी नाशिक: काल नाशिक येथील आदर्श विद्यालय यांनी अतिशय यशस्वीपणे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले. शाळेच्या भव्य पटांगणामध्ये संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प प्रस्तुत केले. सकाळी सात वाजेपासून पर्यंत शहरातील वेगवेगळ्या शाळेमधून विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शन बघण्यास येत होते.

विद्यार्थी अतिशय सुंदरपणे आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सर्वांना देत होते. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी या विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जयंत नारळीकर हे लाभले होते . त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. त्यांनी आपल्या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड निर्माण केली व मार्गदर्शन केले.

अनेक पालक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनी देखील वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या विषयांवरती आपले मत मांडले. श्री मेहता सर यांनी अनेक विज्ञानाच्या क्लुप्त्या लोकांसमोर सादर केल्या. शाळेतील मुख्याध्यापकांनी दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.

बातमी लेखनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/12705147

https://brainly.in/question/15221525

#SPJ3

Similar questions