बातमीलेखन तुमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचा बातमी तयार करा
Answers
Answer:
वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी पालघर जिल्हा परिषद मराठी शाळा एक व दोन येथे ग्रामपंचायत विभागामार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी उपाध्यक्ष नीलेश गंधे, सभापती दामोदर पाटील, दर्शना दुमाडे, धनश्री चौधरी, माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, जि. प. सदस्य भावना विचारे, दिलीप गाटे, अशोक भोये या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. पालघर जिल्हा परिषद मराठी शाळा एक व दोन शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी झाडे लावा झाडे जगवा या घोषणा देत वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांनी ग्रामपंचायतीमार्फत गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा वृक्ष, गावातील ज्या तरुणांचे विवाह होतील त्यासाठी शुभमंगल वृक्ष, कौतुकसोहळ्यासाठी आनंद वृक्ष, गावातील कन्यांचे विवाह होतात त्या कारणासाठी माहेरची झाडी आणि मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी स्मृती वृक्ष लावण्यात यावेत, असे आवाहन