(२) बातमीलेखन (५० ते ६० शब्द) स्वच्छता मोहीम विद्या विकास विद्यालय, दादर स्वच्छता मोहिमेचे आयोजन. प्रमुख पाहुणे - मराठी सिने अभिनेते सचिन पिळगावकर दिनांक - २ ऑक्टोबर स्थळ - दादर चौपाटी, मुंबई स्वच्छता मोहीम राबवल्याची बातमी तयार करून लिहा.
Answers
Answer:
विद्या विकास विद्यालय आयोजित स्वच्छता मोहीम
दिनांकः 2 ऑक्टोबर, दादर- महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त विद्या विकास विद्यालय दादर चौपाटी मुंबई यांनी 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री एन.डी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम पार पडला. मराठी सिने अभिनेते सचिन पिळगावकर हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सचिन पिळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गावातील वेगवेगळ्या चौकात जाऊन साफसफाई केली. विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करण्यात आले होते व प्रत्येक गटात काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील समाविष्ट होते. साफसफाई झाल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेत पुन्हा जमले. अनेक विद्यार्थ्यांनी आपला अनुभव भाषणातून स्पष्ट केला. सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Explanation: