बातमी लेखन ५० ते ६० शब्दाता
तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची बातमी तयार करा
Answers
Answer:
★ बातमी लेखन :
_______________________________
'विखे पाटील मेमोरियल स्कूल' पुणे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
पुणे, ता. 25 'विखे पाटील मेमोरियल स्कूल' पुणे येथे 24 जुलै रोजी गुरुपौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी करण्यात आली. समाजामध्ये असलेले गुरुचे महत्व लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण मंत्री श्री आबासाहेब पाटील तर अध्यक्षस्थानी श्री हर्षवर्धन चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने सुरू झाली. गुरूंमुळे आपल्या जीवनाला योग्य ते वळण मिळते त्यासाठी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आभार स्वरूप भेट म्हणून त्यांच्यासाठी भाषण, कविता आणि गाणी प्रस्तुत केली. प्रमुख अतिथी आणि मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचा समारोप करताना विद्यार्थी प्रतिनिधी गौरी देशमुख यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी ऋत्विज खुराना यांनी केले.
_______________________________
आवश्यक बातमी लेखन: -
ए बी सी स्कूल, महाराष्ट्र
24 जुलै -2021 रोजी आमच्या गुरु-पौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा एक पारंपारिक उत्सव आहे ज्याने सर्व शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंना समर्पित केले आहे ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण जगाला ज्ञान दिले. गुरू तोच आहे जो आपल्याला शैक्षणिक तसेच नैतिक मूल्ये शिकवितो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो.
सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला आणि प्रमुख अतिथी आमच्या सन्माननीय प्रमुख अतिथी उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजेने झाली आणि त्यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय झाला त्यानंतर आमच्या कवितांचे पठण, भाषण, फॅन्सी वेषभूषा आणि नृत्य सादरीकरण आमच्या गुरु-पौर्णिमेच्या विषयावर.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी विजेत्यांना बक्षिसे वितरित केली आणि उपस्थिती व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.