बातमीलेखन : वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Answers
Answer:
वाचन प्रेरणा दिन
|उत्साहात साजरा...
आदर्शनगर, ता. १६ : दि. १५ ऑक्टोबर रोजी | साधना विद्यालय, आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसतातील महत्त्वाच्या चौकांत वाचनसंस्कृती वाचवा' या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात 'उत्कृष्ट वाचन' हि स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास 'उत्कृष्ट वाचन' म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी, या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने | वाचन प्रेरणा दिन साजरा केला.