बातमी लेखन. विषय: डॉ. सर्वपल्ली राधेकृष्णन यांच्या स्मरणार्थ आयोजित 'शिक्षक दिन' कार्यक्रम स्थळ: वासुदेव बळवंत फडके विद्यालय, सावंतवाडी.
Answers
Answer:
डॉ. सर्वपल्ली राधे कृष्णन यांचा स्मरणार्थ आयोजित केला होता व शिक्षक दिन कार्यक्रम स्थळ वासुदेव बळवंत फडके विद्यालय आयोजित केला होता
बातमी लेखन
Explanation:
"वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये शिक्षक दिन कार्यक्रम आनंदाने साजरा"
दिनांक: ५ सप्टेंबर, २०२१, सोमवार.
सावंतवाडी: दिनांक ५ सप्टेंबर, २०२१ रोजी वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधेकृष्णन यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला. दहावी कक्षाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता झाली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने झाली, त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुणे श्री विनय म्हात्रे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. राधेकृष्णन यांच्या फोटोला पुष्पहार घातले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व शाळेतील विद्यार्थ्यांनी "जीवनात शिक्षकांचे महत्व व त्यांचे कार्य" या विषयावर आपले विचार मांडले. काही विद्यार्थ्यांनी 'गुरुचे महत्व' या विषयावर आधारित एक नाटक प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांकडून सगळ्या शिक्षकांना पुष्पगुच्छ देण्यात आले. शाळेच्या शिक्षिका लक्ष्मी करदकर यांनी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांचे आभार मानले.राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.