बातमी लेखन : वायुप्रदूषणामुळे
चिमण्या मृत्युमुखी
please friends answer me
Answers
Answer:
ग्रामीण भागातील चिमण्यांपेक्षा शहरी भागातील चिमण्यांवर वायू प्रदूषण आणि पोषणमूल्यरहित आहाराचा विशेषत: प्रजनन काळात अधिक परिणाम होतो. यामुळे शहरी भागातील चिमण्यांची संख्या गेल्या काही दशकात लक्षणीयरित्या कमी झाली आहे. याउलट ग्रामीण भागातील चिमण्या शहरी वातावरणाशी चांगल्याप्रकारे जुळवून घेतात. स्पॅनिश संशोधकांनी केलेला हा अभ्यास पर्यावरणशास्त्र व उत्क्रांतीमधील ‘जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
हवेची गुणवत्ता आणि आहार यातील फरकामुळे शहरी भागातील चिमण्यांमध्ये ग्रामीण भागातील चिमण्यांपेक्षा ताणतणावसुद्धा अधिक आहे, असे अॅम्पॅरो हेर्रेरा-डय़ुनस या संशोधकाने म्हटले आहे. स्पेनमधील माद्रीदच्या कॉम्प्लटेन्स विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र आणि शारीरिक मानवशास्त्र या विभागाच्या सहकार्याने त्यांनी हा अभ्यास केला आहे. शहरातील वातावरण पक्ष्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे शहरात राहणाऱ्या माणसाने त्याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण चिमण्यांप्रमाणेच पर्यावरणाच्या असमतोलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरही होत आहे, असे त्या म्हणाल्या.
Explanation:
hope it was helpful